श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्णात नियंत्रण रेषेजवळ केरन सेक्टरमध्ये लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. जिल्ह्णात गेल्या २४ तासातील हा घुसखोरीचा दुसरा प्रयत्न आहे. तंगधर सेक्टरमध्ये शनिवारी रात्रभर चाललेल्या चकमकीत एक जवान शहीद तर दोघे जखमी झाले.लष्कराच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केरन सेक्टरच्या जुमागुंड नारमध्ये दहशतवाद्यांचा एक गट भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नियंत्रण रेषेवर तैनात जवानांनी बघितले. जवानांनी आव्हान देताच त्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरातील कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले.तंगधर सेक्टरमध्ये तया जंगलातील रागनी पोस्टजवळ शनिवारी रात्रीपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू झालेली चकमक वृत्त लिहिस्तोवर सुरूच होती.लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यूश्रीनगर: उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्णात गुरेज सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ असलेल्या खोल दरीत घसरून पडल्याने एका लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी नियंत्रण रेषेजवळील जंगलात शोध मोहीम सुरू असताना लष्कराच्या ३६ आरआर युनिटचे कॅप्टन प्रेमकुमार किशन पाटील हे पाय घसरून दरीत पडले. विधानसभा मान्य नाही -पाकइस्लामाबाद : पाकिस्तानात आयोजित राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी जम्मू- काश्मीरच्या विधानसभा अध्यक्षांना निमंत्रण देण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे. जम्मू- काश्मीरची विधानसभा ही कायदेशीर असल्याचे आम्हाला मान्य नाही, असे पाकने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा विशेष परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांनी ही भूमिका मांडली आहे. हा वादग्रस्त प्रदेश असून, पाकिस्तान तेथील विधानसभेला मान्यता देत नाही, असे म्हटले आहे.
काश्मिरात लष्कराने घुसखोरी उधळून लावली
By admin | Published: August 09, 2015 10:25 PM