श्रीनगर : अनंतनाग शहर वगळता उर्वरित संपूर्ण काश्मीरातील संचारबंदी मंगळवारी उठविण्यात आली. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणी मारला गेल्यानंतर खोऱ्यात हिंसाचार सुरू होता. यात दोन पोलिसांसह ४७ जणांचे प्राण गेले तर ५५०० लोक जखमी झाले आहेत. अनंतनाग शहर वगळता काश्मीरच्या सर्व भागातील संचारबंदी उठविल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तथापि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खोऱ्यातील जमावबंदीचे आदेश कायम ठेवण्यात आले. परिस्थिती सुधारत असली तरी मोबाईल फोन, मोबाईल इंटरनेट सेवा आणि रेल्वेसेवा बंदच ठेवण्यात आली होती.पेलेट गनबद्दल क्षमस्वगेल्या दोन आठवड्यांपासून जम्मू आणि काश्मीरातील कायदा व सुव्यवस्थेची घडी कायम ठेवण्याची आघाडी सांभाळणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) पेलेट गनच्या वापरामुळे युवकाच्या डोळ््याला इजा झाल्याबद्दल सोमवारी खेद व्यक्त केला.
काश्मीर खोऱ्यातील संचारबंदी उठवली
By admin | Published: July 27, 2016 1:58 AM