केवडिया : सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीची स्तुती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, भाजप सरकारकडून जम्मू-काश्मीरबाबत घेण्यात आलेला निर्णय हा भारताचे माजी गृहमंत्री सरदार पटेल यांच्याकडून प्रेरित आहे.एका सार्वजनिक सभेत बोलताना मोदी म्हणाले की, अनेक दशकांपासूनच्या समस्येवर तोडगा काढण्याचा हा प्रयत्न आहे. मोदी मंगळवारी ६९ वर्षांचे झाले आहेत. ते म्हणाले की, हैदराबाद मुक्ती दिन हा सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. १७ सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.तत्कालीन गृहमंत्री पटेल यांनी १९४७ मध्ये हैदराबादच्या निजामांना भारतात विलीन होण्याचे सूचित केले होते; पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर सप्टेंबर १९४८ मध्ये हैदराबाद पोलीस अॅक्शन सुरूझाली. त्यानंतर हैदराबादचे भारतात विलीनीकरण झाले. मोदी म्हणाले की, स्टॅच्यू आॅफ युनिटीला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे, याचा आपल्याला आनंद आहे. या ठिकाणी दररोज ८५०० लोक भेट देतात.
काश्मीरचा निर्णय सरदार पटेल यांच्या प्रेरणेतून- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 3:51 AM