श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत गुपकार आघाडीने १०८ तर भारतीय जनता पक्षाने ६० जागांवर विजय मिळविला आहे. हिंदूंचे प्राबल्य असलेल्या जम्मू प्रांतात गुपकार आघाडीने ३७ जागा जिंकल्या, तर काश्मीर प्रांतात भाजपने ३ ठिकाणी विजय मिळविला आहे. कलम ३७० हटविल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांचे लक्ष लागले हाेते.भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची हाेती. एकूण २८० जागांसाठी मतदान झाले हाेते. त्यापैकी ६० जागांवर भाजपने विजय मिळवला, तर गुपकार आघाडीचे सर्वाधिक १०८ उमेदवार विजयी झाले. काँग्रेसनेही २२ जागांवर आघाडी मिळवली आहे.भाजपने जम्मू प्रांतामध्ये आघाडी घेतली. या ठिकाणी भाजपने ५७ जागा जिंकल्या, तर काश्मीर प्रांतामध्ये बांदीपाेरा, श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्यातील प्रत्येकी एका अशा तीन ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. गुपकार आघाडीने सर्वाधिक ७१ जागा जिंकल्या आहेत. दहशतवाद्यांसाेबत संबंध असल्याच्या आराेपावरून अटक करण्यात आलेल्या वाहीद पारा या पीडीपीच्या युवा नेत्यानेही विजय मिळविला आहे.
कलम ३७० हटविल्यानंतरची पहिलीच निवडणूककलम ३७० हटविल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक हाेती. गुपकार आघाडीमध्ये नॅशनल काॅन्फरन्स आणि पीडीपी यासारख्या बलाढ्य स्थानिक पक्षांचे आव्हान हाेते. फारूख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासारखे कट्टर विराेधक भाजपच्या विराेधात एकत्र आले हाेते.