राहुल गांधींच्या 'त्या' विधानाचा पाककडून संयुक्त राष्ट्रात शस्त्रासारखा वापर; काँग्रेसमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 10:32 AM2019-08-28T10:32:12+5:302019-08-28T10:32:56+5:30
पाकिस्तानच्या एका कृत्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली- पाकिस्तानच्या एका कृत्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्ताननं काश्मीरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रात दिलेल्या प्रस्तावात राहुल गांधींच्या विधानाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर काँग्रेसनं या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, पाकिस्तान राहुल गांधींचं नाव विनाकारण बदनाम करत आहे. जेणेकरून ते करत असलेले खोटे दावे खरे ठरतील.
रणदीप सुरजेवाला म्हणाले, पाकिस्तानकडून राहुल गांधींसंदर्भात चुकीची माहिती दिली जात आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत, याबद्दल जग साशंक नाही. पाकिस्ताननं किती खोट बोलण्याचा प्रयत्न केला तर सत्य बदलणार नाही. काश्मीरच्या मुद्द्यावर आम्ही मोदी सरकारबरोबर असल्याचंही यापूर्वीच राहुल गांधींनी सांगितलं आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला लक्ष्य केलं आहे. काश्मीर हे भारताचं अंतर्गत प्रकरण असून, पाकला त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं राहुल गांधींनी सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.Randeep Singh Surjewala, Congress: Let no one in the world be in doubt that Jammu, Kashmir and Ladakh were, are and shall always remain an integral part of India. No amount of diabolical deception by Pakistan shall change this irrevocable truth. https://t.co/f2ISellS2v
— ANI (@ANI) August 28, 2019
ते लिहितात, मी मोदी सरकारच्या अनेक निर्णयांशी असहमत आहे. परंतु मी स्पष्ट करू इच्छितो की, काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. यात हस्तक्षेप करण्यासाठी पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाला गरज नाही. जम्मू-काश्मीरमध्ये झालेली हिंसा हीसुद्धा पाकपुरस्कृत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. पाकिस्ताननं दहशतवादाला खतपाणी घातल्यामुळे एवढी वर्षं जम्मू-काश्मीर अशांत होतं. जगभरातही पाकिस्तानला दहशतवाद्यांचं प्रमुख आश्रयस्थान असल्याच्या नजरेतूनच पाहिलं जातं.There is violence in Jammu & Kashmir. There is violence because it is instigated and supported by Pakistan which is known to be the prime supporter of terrorism across the world.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 28, 2019