ऑनलाइन लोकमत
पेलिंग (सिक्कीम), दि, 21 - काश्मीरमधील स्फोटक परिस्थिती, स्थानिकांमधील असंतोष या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीर हे भारताचेच असल्याचे आज पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे. काश्मीर आमचे आणि काश्मिरी व काश्मिरीयतही आमचीच आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
"काश्मीर, काश्मिरी आणि काश्मिरीयत हे आमचेच आहेत, असे आम्ही मानतो. काश्मीर प्रश्नावरून जो काही पेच निर्माण झाला आहे. त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढून आम्ही हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढू, याची खात्री मी तुम्हाला देतो, असे सिंह यांनी सांगितले.
काश्मीर प्रश्नाचा मुद्दा पुढे करून भारताला अस्थिर करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार करण्यात येत आहेत. आता पाकिस्तानने अशा कारवाया थांबवून सामंजस्य आणि सहकार्याने हा प्रश्न सोडवण्याची वेळ आली आहे. आमच्या शेजारील देशाने आता सुधरले पाहिजे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तो सुधरेल, न सुधरल्यास त्याला सुधरावे लागेल, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
Hum iss sachchai ko jaante hain ki Kashmir bhi humara hai, Kashmiri bhi humare hain aur Kashmiriyat bhi humari hai: HM Rajnath Singh pic.twitter.com/b69M4edjm3— ANI (@ANI_news) May 21, 2017
I want to assure you that our Govt will come up with permanent solution of Kashmir issue: HM Rajnath Singh in Sikkim pic.twitter.com/ppP5oZ8AXE— ANI (@ANI_news) May 21, 2017