शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

बर्फवृष्टीने काश्मिरात जनजीवन विस्कळीत

By admin | Published: January 07, 2017 4:48 AM

काश्मिरात सलग चौथ्या दिवशी, शुक्रवारीही बर्फवृष्टीमुळे झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले

श्रीनगर/ चंदीगड : काश्मिरात सलग चौथ्या दिवशी, शुक्रवारीही बर्फवृष्टीमुळे झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. श्रीनगर-जम्मू महामार्ग बंद करावा लागला आणि हवाई वाहतूक ठप्प होऊन खोऱ्याचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला. खोऱ्यात आगामी दोन दिवस मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी किंवा पाऊस होण्याची शक्यता आहे. श्रीनगरकडे येत असलेली वाहने अवंतीपोरा, अनंतनाग आणि काजीगुुंड येथे, तर जम्मूहून श्रीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना नगरोटा येथे थांबविण्यात आले आहे. महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यास बर्फवृष्टीमुळे अडथळा येत आहे. खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू असल्यामुळे काश्मीर विद्यापीठाने शनिवारी आणि रविवारी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलली. काश्मीर विद्यापीठाच्या ७ आणि ८ तारखेच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, असे विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले. काश्मीर व हिमाचल प्रदेशच्या काही जिल्ह्यांत आगामी २४ तासांत हिमस्खलन होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी धोका असणाऱ्या क्षेत्रात जाऊ नये, असा इशारा शुक्रवारी देण्यात आला. बर्फवृष्टी आणि हिमस्खलन अभ्यास केंद्राने जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला, कुपवाडा, बांदीपोरा, किश्तवाड, राजौरी, डोडा, पूंछ आणि रियासी जिल्ह्यात आगामी २४ तासांत हिमस्खलन होण्याचा इशारा दिला आहे. (वृत्तसंस्था)>पंजाब, हरियाणात धुकेधुक्यामुळे पंजाब, हरियाणातील हवाई, रेल्वे आणि रस्ता वाहतूक शुक्रवारी विस्कळीत झाली. या भागातील किमान तापमान सामान्य पातळीहून अधिक होते. तथापि, दाट धुके पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.