ऑनलाइन लोकमत
जम्मू व काश्मिरमधल्या पीडीपीचे खासदार तारीक हमीद कारा यांनी खासदारकीचा व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती व भाजपा यांच्या धोरणांचा विरोध म्हणून राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले. काश्मिरमधली स्थिती आपल्याला बघवत नसून घुसमट होत असल्याचे त म्हणाले. भाजपा अत्यंत असंवेदनशीलतेने गेले दोन महिने हा प्रश्न हाताळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असलेल्या भाजपाशी युती करणे ही चूक असल्याचे आज सिद्ध झाल्याचा दावा कारा यांनी केला आहे. ज्याप्रकारे गेल्या दोन महिन्यात केंद्राने वागणूक दिली आहे आणि पीडीपी नव्या अवतारामध्ये भाजपाला शरण गेली आहे, ते आपल्याला सहन होत असल्याचे सांगत कारा यांनी खासदारकीसह पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचे घोषित केले आहे.