चंदीगड:पंजाबकाँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे सल्लागार मालविंदर सिंग यांनी काश्मीरबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर जातीय तणाव पसरवल्याचा आरोप केल्यानंतर माली यांनी काश्मीरला वेगळा देश म्हणून म्हटलं होतं.
राज्यांनी ठरवलं तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात, पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
भारत-पाकनं काश्मीरवर कब्जा केला
सिद्धूंचे सल्लागार मालविंदर सिंग मालीने ट्व एका पोस्टद्वारे हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी लिहिले, 'काश्मीर हा काश्मीरी लोकांचा देश आहे. 1947 मध्ये भारत सोडण्याच्या वेळी झालेल्या करारानुसार आणि युनोच्या निर्णयाचं उल्लंघन करुन काश्मीर देशाचे दोन तुकडे झाले, ज्यावर आता पाकिस्तान आणि भारतानं कब्जा केला आहे.'
मालविंदर सिंगवर कारवाई करण्याची भाजपाची मागणी
मालविंदर सिंगच्या वक्तव्यावर टीका करत भाजपा नेते विनीत जोशी यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. 'या लोकांना पंजाबला कुठे न्यायचं आहे, यातून स्पष्ट होतं. काश्मीरसाठी अनेकांनी हौतात्म्य पत्कारल. मालविंदर यांचे वक्तव्य म्हणजे शहिदांच्या कुटुंबीयांचा अपमान आहे', अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, मालविंदर यांच्या वक्तव्यावर सिद्धूंकडून कुठली प्रतिक्रिया आली नाही. तर पंजाब सरकारचे प्रवक्ते आणि मुख्यमंत्री अमरिंदर यांचे निकटवर्तीय राजकुमार वारका यांनी मालविंदर यांना द्वेष पसरवू नका, असा सल्ला दिला आहे.
सशस्त्र हल्लेखोरांचा अंदाधुंद गोळीबार, 14 लहान मुलांसह 37 नागरिकांचा मृत्यू