शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
3
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
4
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
5
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
7
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
8
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
9
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
10
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
11
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
12
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
13
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
14
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
15
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
16
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
17
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
18
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
19
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
20
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर

काश्मिरात पीडीपी फुटीच्या उंबरठ्यावर

By admin | Published: September 16, 2016 12:55 AM

उत्तर प्रदेशमध्ये सत्तारुढ समाजवादी पार्टीतील अंतर्गत कलह शिखरावर पोहोचला असतानाच काश्मिरातील सत्तारुढ पीडीपीमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे

शीलेश शर्मा : नवी दिल्लीउत्तर प्रदेशमध्ये सत्तारुढ समाजवादी पार्टीतील अंतर्गत कलह शिखरावर पोहोचला असतानाच काश्मिरातील सत्तारुढ पीडीपीमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीडीपीच्या संस्थापक नेत्यांपैकी एक खासदार तारिक कर्रा यांनी गुरुवारी पीडीपी आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि पीडीपीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला.‘मी एकटा नाही. माझ्यासोबत पक्षाचे इतर आमदार आणि नेतेही राजीनामा देतील,’ असे कर्रा यांनी लोकमतला सांगितले. १९९८ मध्ये पीडीपीची स्थापना झाली होती त्यावेळी मुफ्ती मोहम्मद सईद, मुजफ्फर बेग, तारिक कर्रा आणि गुलाम हसन मीर हे पक्षाचे संस्थापक सदस्य होते.गुलाम हसन मीर यांनी याआधीच पीडीपीचा राजीनामा दिला आहे. सईद यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. सध्या संस्थापकांपैकी केवळ मुजफ्फर बेग हेच पीडीपीत राहिलेले आहेत. जम्मू-काश्मिरात भाजपा आणि पीडीपीचे आघाडी सरकार स्थापन करण्याला कर्रा यांनी सुरुवातीपासूनच प्रखर विरोध केला होता. परंतु मुफ्ती यांच्यामुळे ते शांत होते. त्यांनी बंडखोरी केली नाही. परंतु मुफ्ती यांच्या निधनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकारवर वर्चस्व गाजवित असल्याचे पाहून कर्रा यांनी पक्षाशी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आणि पक्ष व लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.तथापि लोकसभा अध्यक्षांनी अद्याप कर्रा यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. परंतु पक्षाचे दोन तुकडे करायचेच, असा पक्का निर्धार कर्रा यांनी केलेला दिसतो. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्रा यांच्यासोबत तीन ते चार आमदार आपापला राजीनामा देऊन पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. या आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला तरी मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तूर्तास कसलाही धोका नाही. परंतु पीडीपीला जबर राजकीय हादरा मात्र अवश्य बसणार आहे. कर्रा हे खोऱ्यातील दिग्गज नेते आहेत. त्यांनी फारुख अब्दुल्ला यांनाही धूळ चारलेली आहे. कर्रा हे सध्या पक्षाच्या अन्य आमदारांच्या संपर्कात आहेत आणि पक्षाचे तुकडे झाले तर आपल्यासोबत बहुसंख्य आमदार असावेत, असा त्यांचा प्रयत्न आहे.८७ सदस्यीय विधानसभेत पीडीपीचे २८ तर भाजपाचे २५ आमदार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सजवळ १५ आणि काँग्रेसजवळ १२ आमदार आहेत.