ऑनलाइन लोकमत
पुलवामा, दि. २१ - सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे जम्मू-काश्मीर विधानसभेतील अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीद यांनी पुलवामामध्ये बोलताना काश्मीरी पंडित पळपुटे असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे.
नव्वदच्या दशकात दहशतवादामुळे काश्मीर सोडून निघून गेलेल्या काश्मीरी पंडितांसाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र वसाहत स्थापन करण्याची भाजप सरकारची योजना आहे. पण अब्दुल रशीदसह अनेक काश्मीरी नेत्यांचा या कल्पनेला विरोध आहे.
अब्दुल रशीदने वादग्रस्त विधान किंवा कृती करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये बीफ बॅनला विरोध म्हणून त्यांनी श्रीनगरमध्ये बीफ पार्टी आयोजित केली होती. या त्यांच्या कृती विरोधात भाजप आमदारांनी त्यांना काश्मीरी विधानसभेत मारहाणही केली होती. शेख अब्दुल रशीद हे उत्तर काश्मीरमधून अपक्ष आमदार आहेत.