श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात रविवारी दहशतवाद्यांच्या गोळीबारात बळी पडलेले काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आचन गावातील शर्मा हे एकमेव पंडित कुटुंब आहे आणि त्यांचे मुस्लिम मित्र आणि शेजाऱ्यांनी त्यांच्या अंत्यविधीसाठी शक्य ती सर्व मदत करून एकप्रकारे दहशतवादी आणि द्वेष पसरवणाऱ्यांना चपराक दिली आहे.
४० वर्षीय शर्मा यांच्या मृतदेहावर मुस्लिमांसह नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या उपस्थितीत हिंदू विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले..
आमच्यात शेकडो वर्षांचे ऋणानुबंध...अंत्यसंस्कारासाठी लाकडाची व्यवस्था करणारे मुदासीर अहमद यांनी सांगितले की, “ते (संजय) आमच्यापैकी एक होते. आमच्यात शेकडो वर्षांचे ऋणानुबंध आहेत. आम्ही त्यांचा पंडित म्हणून कधीच विचार केला नाही. ही दुःखद बातमी कळताच आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी धावलो आणि शक्य ती सर्व मदत केली’’.
हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्माअवंतीपोरा : काश्मीरमधील अवंतीपोरा येथील पदगमपोरा भागात सोमवारी रात्रीपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बुधवारी दुपारपर्यंत लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यात दोन दिवसांपूर्वी काश्मिरी पंडिताची हत्या करणारा आकिब मुश्ताक भट याचा समावेश आहे.
‘ती’ वडिलांना शोधतेयदहशतवाद्यांच्या गोळीबारात बळी पडलेले काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची दीक्षा ही पाच वर्षांची मुलगी आपल्या वडिलांच्या आठवणीत रमून गेली आहे. कोणत्या शब्दांनी तिचे सांत्वन करायचे? असा प्रश्न यावेळी अनेकांना पडला.