सुरेश भटेवरा, नवी दिल्ली काश्मीर खोऱ्यातील दगडफेक व हिंसाचारामुळे खोऱ्यातील उरल्यासुरल्या काश्मिरी पंडितांच्या पलायनाचा धोका निर्माण झाला आहे. काश्मिरी पंडितांच्या खोऱ्यात परतीसाठी देशाच्या राजधानीत मोहीम चालू असताना खोऱ्यातील पंडित मात्र घाबरून पलायनाच्या तयारीत आहेत. हिंसाचारामुळे काश्मिरी पंडितांना चिंतेने पछाडले आहे. दिल्लीत अ.भा. काश्मिरी पंडित समुदायाचे उपाध्यक्ष एम.एल. भल्ला यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन याबाबत चिंता व्यक्त केली. यापाठोपाठ पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनीही गृहमंत्र्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. काश्मिरी पंडित कुटुंबांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रयत्न चालवले आहेत.पंतप्रधानांचे आवाहनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. परदेशातून येताच त्यांनी मंगळवारी सकाळी गृहमंत्री राजनाथसिंह, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.पर्यटकांची अक्षरश: लूटश्रीनगर व काश्मीर खोऱ्यातील हिंसाचाराचा पुरेपूर गैरवाजवी लाभ प्रवासी वाहतूक करणाऱ्या एअरलाइन्स व ट्रॅव्हल कंपन्यांनी उठवला आहे. हिंसाचारात अथवा संकटात अडकलेले पर्यटक तसेच अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरूंच्या अडचणीचा पुरेपूर फायदा उठवीत, त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने पैसे उकळले जात आहेत.
काश्मिरी पंडित पलायनाच्या मार्गावर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2016 4:18 AM