उत्तर प्रदेश- गेल्या काही काळापासून देशभरात गाजलेल्या कथुआ सामूहिक बलात्कार प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅब(FSL)नं सर्व पुराव्यांची पडताळणी केली आहे. एफएसएलच्या रिपोर्टनुसार, मंदिरात सापडलेले रक्ताचे डाग हे पीडितेचे आहेत. त्यामुळे 8 वर्षांच्या चिमुकलीवर मंदिरात सामूहिक बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालंय. दिल्लीच्या एफएसएलनं हा रिपोर्ट एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात दिला होता. मंदिरात मिळालेल्या केसांची तपासणी केली असता ते आरोपी शुभम सांगरा याचे असल्याचं निष्पन्न झालं. तसेच पीडितेच्या गुप्तांगातही रक्ताचे डाग आढळल्याचं एफएसएलनं स्पष्ट केलं.जम्मू-काश्मीरच्या पोलिसांच्या विशेष टीम(एसआयटी)लाही चौकशी करताना अडचणींचा सामना करावा लागलाय. कारण त्यांना जे पुरावे मिळाले होते, ते आरोपींना दोषी सिद्ध करण्यासाठी पुरेसे नव्हते. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी कथित स्वरूपात स्थानिक पोलिसांशी हातमिळवणी करून पीडितेचे कपडे धुतले होते. त्यामुळे फॉरेन्सिक लॅबला कपड्यांवर रक्ताचे डाग आढळले नाहीत. त्यामुळे एसआयटी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करू शकली नव्हती.या प्रकरणात राज्याच्या डीजीपींनीही पुराव्यांची तपासणी दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबद्वारे करावी, अशी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मागणी केली होती. मार्चमध्ये मुलीचे कपडे आणि इतर पुरावे दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. पीडितेच्या कपड्यांसह पोलीस अधिकारी दीपक खजुरिया, शुभम सांगरा आणि परवेश यांच्या रक्ताचे नमुनेही लॅबमध्ये पाठवले होते.
Kathua Rape Case : दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनं केला सर्वात मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 9:43 AM