आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. प्रेमाची सुरुवात आईपासून होते. सर्व जग आईच्या कुशीत वसते. पणआईला गमावणं खूप वेदनादायक आहे. ती पुन्हा मिळणं अशक्य आहे. अनेकवेळा मुलं आईच्या प्रेमापायी आणि मनःशांतीसाठी असं काही करतात, जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या कटनीमध्येही मुलाने आईची सिलिकॉनची मूर्ती बनवली आहे.
आई आणि मुलाच्या प्रेमाची अनोखी कहाणी आता समोर आली आहे. आईने जगाचा निरोप घेतल्यावर मुलाने हा अनोखा आदर्श ठेवला आहे. देवाच्या बाजुला आईची सिलिकॉनची मूर्ती ठेवली असून संपूर्ण कुटुंब तिची पूजा करतं. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून असं वातावरण तयार करतात की जणू त्यांची आई जग सोडून गेली नसून घरी त्यांच्यासोबत आहे. लोक वेळोवेळी तिच्यासोबत सेल्फी घेतात. सणही साजरे केले जातात.
सावित्री सोनी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. आईच्या निधनानंतर डॉ. गगन सोनी, आशिष सोनी, अभिषेक सोनी आणि मुलगी रश्मी सोनी या मुलांना खूप दु:ख झालं. कुटुंबातील लोक दु:खातून सावरले, पण धाकटा मुलगा अभिषेक सोनी आई गमावल्यानंतर नैराश्यात गेला. अभिषेक सोनी यांनी सांगितले की, माझ्या आईवर माझे अतूट प्रेम असल्याने मी नेहमीच माझ्या आईच्या आठवणीत हरवून जातो.
आई कुठूनतरी हाक मारत असावी असं वाटत होतं. कुठेतरी दिसेल असा विचार करून तो डिप्रेशनमध्ये जाऊ लागला. यानंतर त्याने आईची सिलिकॉनची मूर्ती पाहिली. जेव्हा आईची सिलिकॉनची मूर्ती अचानक घरी पोहोचली तेव्हा वडील सुरेश कुमार सोनी यांच्यासह सर्व भाऊ आणि इतर कुटुंबीयांना धक्का बसला. वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.