कवर्धा - लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यामध्ये एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. 73 वर्षीय नवरदेव आणि 67 वर्षीय नवरीचं थाटामाटात लग्न झालं आहे. विशेष म्हणजे हे दोघं तब्बल 50 वर्षं लग्नाशिवाय एकत्र राहिले होते आणि त्यांना मुलंही झाली. त्यानंतर आता मुलांनी या दोघांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे ला गावकऱ्यांच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अनोखा विवाह सोहळा पार पडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुकाल निषाद असं नवरदेवाचं तर गौतरहिन बाई अस नवरीचं नाव आहे. गेल्या 50 वर्षांपासून ते एकत्र राहत असून त्यांना तीन मुलं आहेत. सुकाल निषाद हे आपल्या एका नातेवाईकासाठी मुलगी बघायला बेमेतरा जिल्ह्यातील बिरसिंगी गावात आले होते. ज्या मुलीसोबत त्या नातेवाईकाचं लग्न होणार होतं तिची छोटी बहिण सुकाल निषाद यांना पसंत पडली. सुकाल यांनी गौतरहीन यांच्याबरोबर आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी त्यांची परिस्थिती अत्यंत गरीब होती. लग्नाचा खर्च करणं शक्य नव्हतं. त्यामुळे लग्न न करता ते दोघे नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहू लागले अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
सुकाल निषाद आणि गौतरहिन बाई गेल्या 50 वर्षांपासून एकत्र राहत आहेत. मात्र त्यांनी लग्न केलं नसल्याने मृत्यूनंतर या दोघांना मोक्ष प्राप्ती मिळणार नाही अशी चर्चा गावात सुरू होती. त्यामुळे आई-वडिलांसाठी मुलांनी अनोख्या विवाह सोहळ्याचं आयोजन केलं. लग्नामुळे संपूर्ण कुटुंबीय आनंदात आहेत.अत्यंत धुमधडाक्यात गावकऱ्यांच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. छत्तीसगडमध्ये सध्या या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
लष्करातल्या महिला अधिकाऱ्यांना मिळणार कायमस्वरुपी नियुक्ती; मोदी सरकारला 'सर्वोच्च' धक्का
शिवसेना नाणारवरुन यू टर्न घेणार? मुख्यमंत्री कोकणात असूनही आंदोलकांची भेट नाकारणार
हनी ट्रॅप: नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला गोपनिय दस्तावेज पुरविले; 11 अटकेत
आता दुसऱ्या राज्यातून अथवा शहरातून करता येणार मतदान
गेली सत्ता अन् आमदारकी, फसला भाजपा नेत्याचा डाव; अखेर सापडला 'चोरीस' गेलेला तलाव