शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, नितीश कुमारांचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 4:50 PM

जनता दल संयुक्त(जेडीयू)नं मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला आहे.

नवी दिल्लीः जनता दल संयुक्त(जेडीयू)नं मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला आहे. भविष्यातही जेडीयू केंद्रातल्या मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचं पक्षाचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यादरम्यान नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष सरकारमध्ये सहभागी झालेला नाही. त्यांनी मोदी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर नितीश कुमार म्हणाले की, अमित शाह यांनी बोलावल्यानंतर मी दिल्लीत दाखल झालो. त्यानंतर त्यांनी एनडीएच्या घटकपक्षांना एक-एक मंत्रिपद देत असल्याचं सांगितलं. त्यावर मी म्हणालो, मंत्रिमंडळात नाममात्र प्रतिनिधित्व देण्याची गरज नाही. त्यानंतर जेडीयूच्या सर्वच खासदारांनी यावर सहमती दर्शवली आहे. नितीश कुमार हे मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी न झाल्यानं बिहारमधल्या राजकीय परिस्थितीसंदर्भात नव्याच चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता जेडीयूनंही बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी तीव्र केली आहे.काश्मीरमध्ये संविधानाचं कलम 370 हटवणं, अयोध्येतील राम मंदिर निर्माण, तिहेरी तलाक आणि समान नागरी कायदा या सर्वच मुद्द्यांवर जेडीयूचं भाजपापेक्षा वेगळं मत आहे. मोदी कॅबिनेटमध्ये जेडीयूनं सहभागी न होणं आणि बिहारमधल्या नितीश कॅबिनेटमध्ये भाजपाला एकही मंत्रिपद देण्यात न आल्यानं आता भाजपा-जेडीयूतली धुसफूस चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयूला सहभागी करून न घेतल्यानं आम्ही नाराज किंवा असंतुष्ट असल्याची चर्चा निरर्थक असल्याचंही त्यागी म्हणाले आहेत.जदयूच्याच मंत्र्यांना शपथ देण्याबाबत केंद्र सरकारवरील नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या कोट्यातून आधीच मंत्री बनविण्यात आले आहेत. जी खाती रिकामी आहेत ती जदयूची आहेत, असे स्पष्टीकरण जदयूने दिले आहे. मात्र, केंद्रीय मंत्रिपद आणि मोदी सरकारमध्ये जदयू सहभागी न झाल्याने बिहारमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. बिहार कॅबिनेट विस्ताराद्वारे नितीशकुमार दलित आणि मागासलेल्या मतदारांमध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्याची खेळी खेळू शकतात. राज्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक मागासलेल्या समाजांची मते आहेत. पुढील वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे पक्ष याकडे लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच प्रलंबित असलेले प्रकल्पही जलदगतीने पूर्ण करणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमार