टायमिंग! विरोधकांची बिहारमध्ये बैठक, केसीआर यांच्या मुलाने दिल्लीत अमित शहा, राजनाथ सिंहांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 02:40 PM2023-06-23T14:40:20+5:302023-06-23T14:48:18+5:30
देशातील १५ विरोधी पक्षांची आज बिहारमध्ये बैठक सुरू आहे.
बिहारची राजधानी पाटणा येथे आज विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे. देशातील १५ विरोधी पक्ष या बैठकीत उपस्थित आहेत. तर दुसरीकडे भारत राष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष आणि तेलंगणाचे उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री केटी रामाराव हे गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी शुक्रवारी दिल्लीला रवाना झाले आहेत. येथे ते दोन दिवस राहणार आहेत. ते पहिल्यांदाच अमित शहांना भेटणार आहेत.
"हा 'मोदी हटाव' नव्हे तर 'परिवार बचाव' मेळावा, अन् आश्चर्य म्हणजे उद्धव ठाकरे...";
केटीआर यांनी जून २०२२ मध्ये दिल्लीला शेवटचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली होती. तेव्हापासून केटीआर आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव तेलंगणाला सावत्र आईची वागणूक दिल्याचा आरोप करत केंद्रावर टीका करत आहेत.
एका बीआरएस नेत्यांना या संदर्भात प्रतिक्रिया दिली. ही भेट केवळ तेलंगणाशी संबंधित प्रकल्पाच्या विलंबा संदर्भात असल्याचं त्यांनी म्हटले आहे. मात्र, या भेटीच्या वेळेवरून राजकीय वातावरण तापले आहे. कारण आज पाटणा येथे विविध विरोधी पक्ष एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाविरोधात लढण्याची रणनीती आखणार आहेत.
पटना येथे विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीसाठी केसीआर यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी बुधवारी सांगितले होते की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध लढण्याबाबत बीआरएस अध्यक्षांकडून कोणतेही स्पष्ट संकेत मिळाले नाहीत.
एका बीआरएस नेत्याने सांगितले की, केटीआर केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीत राजकारणावर चर्चा करणार नाहीत. “बीआरएसचे कार्याध्यक्ष फक्त सिकंदराबाद कॅन्टोन्मेंटमध्ये उड्डाणपूल आणि स्कायवे बांधण्यासाठी संरक्षण जमिनीचे वाटप, रसूलपुरा येथे रस्ता विस्तारीकरणासाठी एमएचएच्या जमिनीचे वाटप, वारंगलमधील ममनूर येथील विमानतळाचा विकास इत्यादी मुद्दे केंद्राकडे आहेत. मेट्रो रेल्वेच्या बाबतही चर्चा होणार आहे.
दरम्यान, तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणाशी संबंधित विकासकामे पुढे नेण्याच्या नावाखाली केंद्रीय मंत्र्यांची, विशेषत: अमित शहा यांची भेट घेण्यासाठी केटीआरच्या दिल्ली दौऱ्यामागे एक राजकीय असल्याचे तेलंगण भाजपचे अध्यक्ष बंदी संजय यांनी सांगितले. ते म्हणाले, “केटीआर केंद्रातील भाजप सरकारला दोष देऊ इच्छित असल्याचे दिसते. राज्याच्या विकास कार्यक्रमात केंद्र सहकार्य करत नसल्याची प्रसिद्धी त्यांना द्यायची आहे, असा टोला त्यांनी लगावला.