लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्यात अटक केलेले आपचे नेते विजय नायर यांना दक्षिण भारतातील काही लोकांकडून १०० कोटी रुपयांची लाच मिळाली होती. हे पैसे देणाऱ्यांमध्ये काही व्यावसायिक व राजकीय नेत्यांचा समावेश आहे. त्या राजकीय नेत्यांमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांचेही नाव सामील असल्याचा दावा ईडीने केला.
आपच्या काही नेत्यांनी (त्यातले काहीजण दिल्लीच्या मंत्रिमंडळात आहेत) दारू परवाना धोरणाचा वापर बेकायदेशीररीत्या पैसा गोळा करण्यासाठी केला असा दावा ईडीने केला होता. विजय नायर यांना १०० कोटी रुपयांची लाच देणाऱ्यांमध्ये दक्षिण भारतातील काही लोकांचा समावेश होता. त्या लोकांवर सरत रेड्डी, के. कविता, मंगुता श्रीनिवासुलू रेड्डी यांचे नियंत्रण होते, असे ईडीने म्हटले आहे.