कारकून, शिक्षक न होता उच्च ध्येय ठेवा
By admin | Published: February 07, 2016 10:45 PM
जळगाव : काळनुरूप शिक्षण क्षेत्रात नानाविध संधी उपलब्ध झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी केवळ कारकून किंवा शिक्षक व्हायचंय यापुरता मर्यादीत राहू नका; तर उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनतीने विद्यार्थ्यांनी पुढे आगेकूच करावी, असा सल्ला पालकमंत्री तथा राज्याचे महसूल व कृषि मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे केले.
जळगाव : काळनुरूप शिक्षण क्षेत्रात नानाविध संधी उपलब्ध झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी केवळ कारकून किंवा शिक्षक व्हायचंय यापुरता मर्यादीत राहू नका; तर उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनतीने विद्यार्थ्यांनी पुढे आगेकूच करावी, असा सल्ला पालकमंत्री तथा राज्याचे महसूल व कृषि मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे केले. जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर नोकरांची नागरी पतपेढीतर्फे रविवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात पतपेढीच्या सभासदांचे गुणवंत पाल्य व आदर्श शिक्षकांच्या सतत्काराप्रसंगी ते बोलत होते. मंचावर खासदार ए. टी. पाटील, जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, शिक्षणाधिकारी देवीदास महाजन (माध्यमिक), भास्कर पाटील (प्राथमिक), माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. किरण पाटील, उप शिक्षणाधिकारी एस. टी. वराडे, किशोर वायकोळे, विकास पाटील गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, विजय पवार, पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरूड व संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने कर्ज द्या! जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीद्वारे अतिशय कमी व्याज दरात कर्ज दिले जाते. परंतु, कर्ज देणे आणि ते वसूल करणे असा उद्देश ठेऊ नका. कर्जदाराच्या सर्वांगिण विकास होईल, यादृष्टीने कर्ज द्यावे, असे आवाहन खडसे यांनी केले. पेपरलेस प्रणाली सुरू करा जिल्हा माध्यमिक पतपेढी ५१ वर्षापासून चांगले काम करत आहे. सभासद हिताच्या दृष्टीने विविध योजना पतपेढीने सुरू केल्या आहेत. परंतु, पतपेढीने सभासदांना ऑनलाईन कर्ज उपलब्ध होईल, अशी व्यवस्था निर्माण करावी. सभासदांना कर्जासाठी विविध कागदपत्र व त्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागू नये, म्हणून पेपरलेस प्रणाली सुरू करावी. त्यामुळे सभासदांचा वेळेचा अपव्यय होणार नाही. पूर्वी जिल्हा बॅँकेच्या शाखेतून कर्ज घेणार्या कर्ज दाराच्या बॅँक खात्यातून कपात होत नव्हती. परंतु, आता या बॅँकेत बॅँकिंग प्रणाली अंतर्गत थेट कर्जदाराच्या बॅँक खात्यातून कर्जाची वसुली होत आहे. याचे श्रेय त्यांनी विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांचे असल्याचे खडसे यांनी नमूद केले.