मोदी-शाहांच्या गुजरातमध्ये आप किती जागा जिंकणार? सर्वेक्षणातून मोठा आकडा समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 09:02 AM2022-04-05T09:02:21+5:302022-04-05T09:05:45+5:30

पंजाब जिंकल्यानंतर आपचं लक्ष गुजरातवर; अंतर्गत सर्वेक्षणानंतर मोठा दावा

kejriwal aap claims will win 58 seat in gujarat assembly election after internal survey | मोदी-शाहांच्या गुजरातमध्ये आप किती जागा जिंकणार? सर्वेक्षणातून मोठा आकडा समोर

मोदी-शाहांच्या गुजरातमध्ये आप किती जागा जिंकणार? सर्वेक्षणातून मोठा आकडा समोर

googlenewsNext

अहमदाबाद: दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये सत्ता मिळवणाऱ्या आम आदमी पक्षानं आता गुजरातवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आपनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकताच गुजरातचा दौरा केला. त्यानंतर आता पक्षानं सर्वेक्षणातून समोर आलेली महत्त्वाची माहिती दिली आहे.

येत्या निवडणुकीत गुजरातमध्ये पक्षाला ५८ जागा मिळतील, असं आपचा अंतर्गत सर्व्हे सांगतो. पक्षानं एका एजन्सीच्या माध्यमातून सर्वेक्षण केल्याचं आपचे प्रदेश प्रभारी डॉ. संदीप पाठक यांनी सांगितलं. काँग्रेसच्या असंतुष्ट ग्रामीण मतदारांची आपला साथ मिळेल. यासोबतच शहरी भागातील गरीब आणि मध्यम वर्गातील मतदारही आपकडे वळतील अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. 

सध्याच्या घडीला आम्ही अशा स्थितीत आहोत की विधानसभेच्या ५८ जागा जिंकू शकतो, असं पाठक म्हणाले. 'ग्रामीण गुजरातमधील मतदार आम्हाला मतदान करतील. शहरातील गरीब आणि मध्यम वर्गाला बदल हवा आहे. तो आम्हाला मतदान करेल,' असं पाठक यांनी सांगितलं. पंजाबमध्ये आपनं दणदणीत विजय मिळवला. त्या विजयात पाठक यांचं महत्त्वाचं योगदान आहे. पंजाबमधून आपनं त्यांना राज्यसभेवर पाठवलं आहे.

काँग्रेस भाजपचा पराभव करू शकत नाही, असं ग्रामीण जनतेला वाटतं. त्यामुळे तिथला काँग्रेसचा मतदार आपकडे वळेल. सध्याची ही स्थिती आहे आणि निवडणूक जसजशी जवळ येईल, तशी आपकडे वळणाऱ्या मतदारांची संख्या वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप सरकारनं राज्यात केलेल्या सर्वेक्षणातून आपला ५५ जागा मिळतील अशी आकडेवारी समोर आल्याचा दावाही त्यांनी केला.

Web Title: kejriwal aap claims will win 58 seat in gujarat assembly election after internal survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.