ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल ठेवत अरविंद केजरीवालांनी मीडियावरच टीका केली आहे. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीच्या पदरी अपयश येणार असल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर अरविंद केजरीवालांनी मीडियालाच लक्ष्य केलं आहे. काही पत्रकार हे पेड न्यूज देत आहेत. मीडियातील भ्रष्टाचारावर उघड चर्चा करण्याची आता वेळ आली आहे. कोणाकडे किती संपती आहे, कोणाचा पैसा कोणत्या चॅनेलमध्ये लागला आहे, यावरही चर्चा झाली पाहिजे. ज्याप्रमाणे भाजपा, काँग्रेस आणि अकाली दलवाले एकमेकांना वाचवतात. तसेच मीडियावालेसुद्धा एक दुस-यांच्या दलालीला का थारा देतात ?, दोघांमध्येही काय फरक राहिला ?, असं म्हणत त्यांनी मीडियावरही टीका केली आहे.(... तर पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्यायला हवा - अरविंद केजरीवाल)(मोदी मला मारुन टाकतील - अरविंद केजरीवाल)पत्रकारांमध्येही मैत्री पाहायला मिळते. एखादा पत्रकार दलाली करत असल्यास बाकीचे पत्रकार त्याला वाचवण्यासाठी पुढे येतात. त्यांना स्वतःच्या मित्रांची दलाली दिसत नाही ?, सत्याला असत्य आणि असत्याला सत्य दाखवणा-या पत्रकारांना काय म्हटलं पाहिजे ?, दलाल की पत्रकार, अशी घणाघाती टीका ट्रम्पसारखे ते मीडियावरही घसरले आहेत.
समय आ गया जब मीडिया के भ्रष्टाचार पर खुल के चर्चा हो, नाम ले ले कर चर्चा हो, किसके पास कितनी सम्पत्ति है, किसका पैसा किस चैनल में लगा है— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) 30 January 2017
जैसे भाजपा कोंग्रेस अकाली दल वाले एक दूसरे को बचाते हैं, वैसे मीडिया वाले भी एक दूसरे की दलाली को क्यों बचाते हैं? क्या फ़र्क़ रह गया? https://t.co/MWQo2Nvugx— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) 30 January 2017
पत्रकारों में बड़ी दोस्ती है। कोई पत्रकार दलाली करे तो आप जैसे सारे उसे बचाने के किए कूद पड़ते हैं। अपने दोस्तों की दलाली नहीं दिखती? https://t.co/oYMx2YgakL— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) 30 January 2017
अपने मालिकों के सामने सिर झुकाकर सच को झूठ और झूठ को सच लिखने और दिखाने वाले पत्रकार को क्या कहा जाये ? दलाल या पत्रकार !!— ashutosh (@ashutosh83B) 30 January 2017