शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

जगातील ५० महान नेत्यांत केजरीवाल

By admin | Published: March 26, 2016 12:56 AM

फॉर्च्युन नियतकालिकाने जगातील ५० महान नेत्यांच्या आपल्या यादीत नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा समावेश केला आहे. या यादीत स्थान मिळविणारे

न्यूयॉर्क : फॉर्च्युन नियतकालिकाने जगातील ५० महान नेत्यांच्या आपल्या यादीत नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा समावेश केला आहे. या यादीत स्थान मिळविणारे केजरीवाल हे एकमेव भारतीय नेते आहेत. पहिले स्थान अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस यांना मिळाले आहे.फॉर्च्युनच्या ‘वर्ल्डस् ५० ग्रेटेस्ट लीडर्स’ या तिसऱ्या वार्षिक यादीत जगात बदल घडवू पाहणाऱ्या व इतरांनाही त्यांच्यासारखे काम करण्यास प्रेरित करणाऱ्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख केजरीवाल (४७) यांना या यादीत ४२ वे स्थान मिळाले आहे. यादीत दक्षिण कॅरोलिनाच्या भारतीय वंशाच्या अमेरिकी गव्हर्नर निकी हेले १७ व्या, तर अन्य एक भारतीय रेशम सौजानी २० व्या स्थानी आहेत. सम-विषम योजनेद्वारे नवी दिल्लीतील प्रदूषण रोखण्याच्या उपायाबद्दल फार्च्युनने केजरीवाल यांचे नाव या यादीत समाविष्ट केले आहे. फॉर्च्युनने केजरीवाल यांची प्रशंसा करताना लिहिले आहे की, केजरीवाल यांनी वाहनांच्या धुरामुळे दिल्लीवर पसरणारी हवेची धुरकट चादर हटविण्यासाठी ‘सम-विषम’चा आराखडा सादरा केला तेव्हा अनेकांनी या योजनेच्या यशस्वीतेबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. जागतिक आरोग्य संघटनेने नवी दिल्लीला जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हटले होते. सम-विषम योजनेअंतर्गत दिल्लीत सम आणि विषम नंबरच्या गाड्या रस्त्यावर आलटून-पालटून चालविण्यात आल्या. गेल्या जानेवारीत सम-विषमचे चांगले परिणाम मिळाले. (वृत्तसंस्था)