नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेकांची आर्थिक स्थिती सध्या बिकट झालेली आहेत. त्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. अशा परिस्थितीत दिल्लीतीलअरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात डिझेलच्या किमतीमध्ये घट करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीती आप सरकारने डिझेलवरील व्हॅट ३० टक्क्यांवरून घटवून १६.७५ टक्के केला आहे. त्यामुळे दिल्लीतील डिझेलची किंमत ८.३६ टक्क्यांनी घटून ८२ रुपयांवरून थेट ७३.६४ रुपये होणार आहे. दिल्ली सरकारच्या कॅबिनेटने निर्णयाला आज मंजुरी दिली आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीने यासंदर्भातील एक ट्विट केले असून, त्या माध्यमातून, इतर राज्यांमधील डिझेलची किंमत आणि दिल्लीतील डिझेलची किंमत यांची तुलना करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल