शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

मोदी विरोधात केजरीवाल-हार्दिक येणार एकत्र?

By admin | Published: October 16, 2016 10:10 AM

केजरीवाल-हार्दिक एकत्र आल्यास गुजरातमधील राजकीय समीकरणे बदलू शकतात. केजरीवाल गुजरातमध्ये समाजासाठी काय करू शकतात? हे त्यांनी आताच मांडावे असेही हार्दिकने त्याच्या निवेदनात म्हटले आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १६ - गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पाटीदार आरक्षण आंदोलनाचा प्रणेता हार्दिक पटेलने आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी हातमिळवण्याची तयारी चालवली असल्याचे वृत्त आहे. हार्दिकने एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यामध्ये केजरीवालांच्या गुजरात भेटीचे स्वागत केले आहे.

केजरीवाल-हार्दिक एकत्र आल्यास गुजरातमधील राजकीय समीकरणे बदलू शकतात. केजरीवाल गुजरातमध्ये समाजासाठी काय करू शकतात? हे त्यांनी आताच मांडावे असेही हार्दिकने त्याच्या निवेदनात म्हटले आहे. जर हार्दिक-केजरीवाल एकत्र आल्यास भाजपाला ही विधानसभा नक्कीच जड जाणार आणि आम आदमी पक्षाची ताकद वाढणार यात काही शंका नाही. जर असं झाल्यास यंदा गुजरातमध्ये आपल्याला त्रिशंकू लढत पहायला मिळेल.

दरम्यान, केजरीवाल सध्या गुजरातच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असून, भाजपला लक्ष्य करण्यासाठी ते जाणीवपूर्वक पटेलांच्या बालेकिल्ल्यांना भेट देणार आहेत. पटेल समाज हा भाजपची हक्काची व्होटबँक म्हणून ओळखला जातो त्यालाच सुरुंग लावण्याचे नियोजन आम आदमी पक्षाने आखले आहे. हार्दिक पटेलची तुरुंगातून सुटका होताच सर्व राजकीय पक्षांनी त्याचा पाठिंबा मिळावा म्हणून प्रयत्न चालविले आहे