नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी मंगळवारी मुख्यमंत्री आवास योजना सुरू केली आहे. आम आदमी पक्षाच्या वतीने दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीला पक्के घर देणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल सरकारकडून राज्यातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या 65 हजार कुटुंबांना मंगळवारी प्रमाणपत्र देण्यात आले असून लवकरच त्यांना पक्की घरे देण्यात येणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान केजरीवाल यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीचे रिपोर्ट कार्ड सादर केले. त्यांनी आपल्या सरकारच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवला आहे.