केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 05:20 PM2024-05-16T17:20:31+5:302024-05-16T17:21:39+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कारागृहातून बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान भाजप नव्हे, तर काँग्रेसचेच होणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कारागृहातून बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान भाजप नव्हे, तर काँग्रेसचेच होणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (AAP) हा I.N.D.I.A.चा भाग आहे. दिल्लीमध्येकाँग्रेस आणि आप सोबत निवडणूक लढवत आहेत. मात्र, पंजाबमध्ये हे दोन्ही पक्ष एक-मेकांसमोर उभे ठाकले आहेत.
प्रशांत किशोर आरटीव्हीला दिलेल्या एका मुलाखती म्हणाले, "आप संपूर्ण भारतभरात 13 जागा पंजाबमध्ये 7 जागा दिल्लीत तर एक जागा गुजरातमध्ये लढवत आहे. यामुळे केजरीवाल बाहेर आल्याने जो काही बदल होणार तो केवळ याच जागांवर होईल. यांपैकी पंजाबच्या 13 जागांवर आप आणि काँग्रेस यांच्यात थेट फाइट आहे. येथे जर आपला फायदा झाला, तर नुकसान काँग्रेसचेच होईल.''
पीके म्हणाले, पंजाबमध्ये भाजपही निवडणूक लढवत आहे. मात्र आपची खरी फाईट कांग्रेससोबत आहे. 2019 मध्ये, भाजपने पंजाबमध्ये गुरदासपूर आणि होशियारपूरमध्ये विजय मिळवला होता. यावेळी भाजपने राज्यातील सर्वच्या सर्व 13 जागांवर उमेदवार उतरवले आहेत.
आपच्या कार्यकरत्यांचे मनोबल वाढेल -
प्रशांत किशोर म्हणाले, केजरीवाल कारागृहातून बाहेर आल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे मनोबल वाढेल. मात्र ते पंजाब आणि दिल्ली व्यतिरिक्त बाहेरील मतदारांच्या भावनांना प्रभावित करू शकणार नाहीत. महत्वाचे म्हणजे, दिल्लीमध्ये 7 लोकसभा जागांसाठी 25 मे रोजी, तर पंजाबमधील 13 जागांवर 1 जूनरोजी मतदान होईल.