केजरीवाल, लोकांच्या जीवावर का उठला आहात? अलका लांबांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 05:48 PM2020-05-04T17:48:46+5:302020-05-04T17:49:35+5:30
लॉकडाऊन-3 मध्ये केंद्र सरकारने दारूची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. कर्नाटकात सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दारूची दुकाने उघडली जाणार आहेत. दरम्यान, दारूची दुकाने उघडणार असल्याने मद्यप्रेमींनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कर्नाटकातील हुबळीमध्ये एका दारूच्या दुकानाबाहेर सकाळी सात वाजताच लोकांनी रांगा लावल्या होत्या. तर, राजधानी दिल्लीतही हीच परिस्थिती आहे. काँग्रेस नेत्या आणि माजी आमदार अलका लांबा यांनी एक व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलंय.
लॉकडाऊन-3 मध्ये केंद्र सरकारने दारूची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच, प्रत्येक जण मास्क लावून किंवा चेहरा झाकून दारू खरेदी साठी येईल. दरम्यान, काही ठिकाणी दारूच्या दुकानासमोर सोशल डिस्टंसिंगसाठी आखण्यात आलेल्या सर्कलवर लोक उभे असल्याचे दिसून येत आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती दिसत आहे. दारुच्या दुकानाबाहेर लोकांची रांग लागली असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी एक व्हिडिओ शेअर करत दिल्लीतील दारु दुकानाबाहेर लागलेल्या रांगा आणि गर्दीवरुन अरविंद केजरीवाल यांना टार्गेट केलं आहे. दारु दुकानाबाहेरील या रांगांमध्ये कुठेही सोशल डिस्टन्सचे पालन दिसत नाही, किंवा लोकांना दारुपुढे कोरोनाचं काहीच वाटत नाही, असेच दिसून येत आहे.
हे राम :(....#Delhi#Lockdown#Covid_19#Kejriwal क्यों दिल्ली वालों को मरवाने पर तुले हो ?? https://t.co/8YBhBJXpht
— Alka Lamba - अलका लाम्बा🇮🇳 (@LambaAlka) May 4, 2020
अलका लांबा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना, हे राम... असे कॅप्शन दिलंय. त्यासोबतच, केजरीवाल, लोकांच्या जीवावर का उठलायंत ? असा प्रश्न लांबा यांनी विचारला आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे माजी नेते डॉ. कुमार विश्वास यांनीही मैराज फैदाबादी यांची शायरी ट्विट करत दारु दुकानाबाहेर लागलेल्या रांगांबद्दल मत व्यक्त केलं आहे.
मैकदे में किसने कितनी पी ख़ुदा जाने मगर,
मैकदा तो मेरी बस्ती के कई घर पी गया..!”
अशी आशयपूर्ण शायरी ट्विट करुन कुमार विश्वास यांनी दारुमुळे गोरगरीब आणि गरिब वस्तीतील कुटुंबीयांची व्यथा आपल्या शब्दातून मांडली आहे. दारुसाठी लागलेली रांग हे नक्कीच निराशावादी चित्र असल्याचे विश्वास यांनी आपल्या ट्विटमधून सूचवलंय.