ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १६ - आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हरवले आहेत....शोधून देणा-यास योग्य बक्षिस देईल असे पत्रक दिल्लीतील गोलमार्केट परिसरातील भिंतींवर आढळल्यास चक्रावून जाऊन नका. केजरीवाल यांच्या विधानसभा मतदारसंघात येणा-या गोलमार्केटमधील व्यापा-यांनी स्थानिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ हे फलक लावले आहेत.
गोलमार्केट परिसरातील भिंतींवर मंगळवारपासून केजरीवाल हरवल्याची पत्रक लावण्यात आली आहेत. गोलमार्केट परिसर केजरीवाल यांच्या मतदारसंघात येत असून या भागातील व्यापारी व रहिवाशांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. यासाठीच ही पत्रक लावल्याचे सांगितले जाते. याच्या निषेधार्थ काही जणांनी केजरीवाल हरवल्याचे पत्रक लावले आहेत. RWG मार्केट आणि RWG व्यावसायिक या नावाने ही पत्रक लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे सोमवारी केजरीवाल यांनीही ४९ दिवस कोणाचे चांगले, आपचे की मोदी सरकारचे ? असा सवाल विचारणारे पत्रक लावले होते.
दरम्यान, बुधवारी केजरीवाल यांनी भाजप आपच्या एका आमदारासाठी तब्बल २० कोटी रुपये मोजायला तयार असल्याचे आरोप केला आहे.