कोची- केरळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरानं आतापर्यंत 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या पुरामुळे केरळमधलं जनजीवन पूर्णतः उद्ध्वस्त झालं आहे. पाऊस ओसरला असला तरी अनेक भाग अद्यापही पाण्याखाली आहेत. त्याच दरम्यान कोथडूमधल्या कदमक्कुडीमध्ये 54 वर्षांच्या रॉकी या व्यक्तीनं पुरामुळे झालेली घराची दुर्दशा पाहून आत्महत्या केली आहे.सेंट अल्बर्ट कॉलेजच्या शिबिरात राहणारा पूरग्रस्त कुटुंबे स्वतःच्या घरी परतली. ते माणसे स्वतःच्या घराची साफसफाई करण्यासाठी आली होती. रॉकीच्या शेजा-यांच्या मते, ज्या दिवशी रॉकीच्या कुटुंबीयांनी घराची दुर्दशा पाहिली, त्यावेळी त्याची पत्नी आणि मुलगा पुन्हा शिबिरात परतले. परंतु रॉकी काही परतला नाही. तसेच रॉकीला काही लोकांनी 9.30च्या सुमारास शेजा-यांशी बातचीत करतानाही पाहिलं होतं. बुधवारी सकाळी 9 वाजत जेव्हा नातेवाईकांनी पाहिलं तेव्हा त्यांचा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर खिडकीतून पाहिलं असता रॉकीनं गळफास घेतल्याचं दृश्य नजरेस पडलं.घराचं दुर्दशा पाहून होता चिंतेतरॉकी घराची दुर्दशा पाहून फारच चिंतेत होता. त्यामुळेच त्यानं आत्महत्या केली आहे. पुन्हा एवढा संसार कसा उभा करायचा हा प्रश्न त्याला सतावत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Kerala Floods: मोडलेलं घर पाहून 'तो' कोलमडला, गळफास लावून तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 12:34 PM