कौतुकास्पद! 105 वर्षीय आजीने 75% गुण मिळवून रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 01:18 PM2020-02-06T13:18:35+5:302020-02-06T13:21:51+5:30

शिक्षणाला वयाची अट नसते याचं उत्तम उदाहरण केरळमध्ये पाहायला मिळालं आहे.

kerala 105 year old bageerathi amma in kollam who appeared fourth standard exam | कौतुकास्पद! 105 वर्षीय आजीने 75% गुण मिळवून रचला इतिहास

कौतुकास्पद! 105 वर्षीय आजीने 75% गुण मिळवून रचला इतिहास

Next
ठळक मुद्देकेरळच्या 105 वर्षीय आजीने चौथीच्या परीक्षेत 75% गुण मिळवून इतिहास रचला आहे.भागिरथी अम्मा असं आजीचं नाव असून त्यांनी चौथीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे.आजीला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहे.

तिरुअनंतपुरम - शिक्षणाला वयाची अट नसते याचं उत्तम उदाहरण केरळमध्ये पाहायला मिळालं आहे. केरळच्या 105 वर्षीय आजीने चौथीच्या परीक्षेत 75% गुण मिळवून इतिहास रचला आहे. साक्षरता अभियानाअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या त्या सर्वात जास्त वयाच्या व्यक्ती ठरल्या आहेत. भागिरथी अम्मा असं आजीचं नाव असून त्यांनी चौथीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. भागिरथी अम्मा यांनी केरळमधील साक्षरता अभियानाअंतर्गत  चौथीची परीक्षा दिली होती. बुधवारी (5 फेब्रुवारी) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या भागिरथी अम्मांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. मात्र आईच्या मृत्यूनंतर भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे शिक्षणाचं त्यांचं स्वप्न त्यांना पूर्ण करता आलं नाही. मात्र केरळमधील साक्षरता अभियानाबाबत माहिती मिळता पुन्हा शिकण्याची इच्छा झाली. आजीला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहे. तर परीक्षेत त्यांना 275 पैकी 205 मार्क मिळाले आहेत. साक्षरता अभियानांतर्गत 11,593 जणांनी चौथीची परीक्षा दिली. त्यात 10,012 जण उत्तीर्ण झाले आहेत. 

काही महिन्यांपूर्वी केरळच्या 96 वर्षीय आजीने परिक्षेत 98% गुण मिळवून एक इतिहास रचला होता. ‘अक्षरलक्ष्यम’ साक्षरता कार्यक्रमांतर्गत झालेल्या परीक्षेत आजीने 100 पैकी 98 टक्के मिळवत पहिला क्रमांक पटकावला होता. कार्तियानी अम्मा असं या आजीचं नाव आहे. 7 नोव्हेंबर रोजी केरळ सरकारने आजीला बक्षीस म्हणून नवीन लॅपटॉप दिला. परीक्षेत टॉपर असलेल्या आजीने काही दिवसांपूर्वी संगणक शिकण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळेच केरळ सरकारचे शिक्षणमंत्री रवींद्रनाथ यांनी कार्तियानी अम्माला लॅपटॉप दिला.

ऑगस्टमध्ये ‘अक्षरलक्ष्यम’ साक्षरता परीक्षा घेण्यात आली होती. 31 ऑक्टोबरला या परिक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला होता. परीक्षेत यश संपादन केल्यानंतर आजींना तुम्ही 96 वर्षीय वयात संगणक शिकू इच्छिता का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर 'कोणी मला संगणक देत असेल तर मी नक्की शिकेन' असं उत्तर दिलं होतं. कार्तियानी अम्मा यांना दहावीची परीक्षा पास होण्याची देखील इच्छा आहे. 
 

महत्त्वाच्या बातम्या 

EXCLUSIVE : वरवरा राव, सुरेंद्र गडलिंग यांच्या पैशांवरून पत्रव्यवहार; धक्कादायक उल्लेख

डोनाल्ड ट्रम्प निर्दोष, महाभियोग खटल्यातून सुखरुप सुटणारे तिसरे राष्ट्राध्यक्ष 

हिरे उद्योगाला 'कोरोना'चा फटका; 8000 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणं ही मोदींची घातक चूक - इम्रान खान 

'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया!

 

Web Title: kerala 105 year old bageerathi amma in kollam who appeared fourth standard exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.