मास्क घालून बोला बिनधास्त, इंजिनिअरनं बनवला माईकवाला मास्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 12:00 PM2021-05-24T12:00:36+5:302021-05-24T12:02:45+5:30

थ्रिसर सरकारी अभियांत्रिकी विद्यालयातील बीई फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना मास्कमुळे बोलताना येणारी अडचण लक्षात घेऊन माईकवाला मास्क बनवला आहे. विशेषत: डॉक्टर्स आणि इतर आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन या मास्कची निर्मित्ती करण्यात आली आहे.

Kerala B-Tech student designs 'masks with mics' to ease communication amid Covid | मास्क घालून बोला बिनधास्त, इंजिनिअरनं बनवला माईकवाला मास्क

मास्क घालून बोला बिनधास्त, इंजिनिअरनं बनवला माईकवाला मास्क

Next
ठळक मुद्देकेविनचे आई-वडिल दोघेही डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांना बोलताना होणारा त्रास लक्षात आल्याने केविनने या मास्कच्या निर्मित्तीसाठी प्रयत्न केले. विशेष म्हणजे या प्रयोगात तो यशस्वीही झाला.

कोची - कोरोनासोबत जगायला शिका असंच आपल्याला सांगण्यात येतंय. कारण, गेल्या 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून मास्क, सॅनिटायजर आणि सामाजिक अंतर हे आपणास बंधनकारक बनलंय. त्यामुळे, मास्क असल्याशिवाय घराबाहेर पडणेही कठीण बनलंय. या परिस्थिीचा सामना करताना, अनेकजण नवनवी वस्तू पहायला मिळत आहेत. मास्कचेही विविध प्रकार आपण अनुभवले आहेत. आता, माईकवाल्या मास्कची निर्मिती एका केरळमधील तरुणाने केली आहे. 

थ्रिसर सरकारी अभियांत्रिकी विद्यालयातील बीई फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना मास्कमुळे बोलताना येणारी अडचण लक्षात घेऊन माईकवाला मास्क बनवला आहे. विशेषत: डॉक्टर्स आणि इतर आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन या मास्कची निर्मित्ती करण्यात आली आहे. केविन जॉकोब असे या मास्कचं संशोधन करणाऱ्या मुलाचं नाव असून त्याचे वडिल डॉक्टर आहेत. स्वत:च्या वडिलांना बोलताना किंवा संवाद साधाताना मास्कमुळे होणारी अडचण लक्षात घेऊन केविने माईक आणि स्पीकरधारित मास्क बनवला आहे. 

केविनचे आई-वडिल दोघेही डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांना बोलताना होणारा त्रास लक्षात आल्याने केविनने या मास्कच्या निर्मित्तीसाठी प्रयत्न केले. विशेष म्हणजे या प्रयोगात तो यशस्वीही झाला. त्यानंतर, सर्वप्रथम स्वत:च्या आई-वडिलांनाच त्याने हे मास्क वापरण्यास दिले होते. डॉ. सेनोज केसी आणि डॉ. ज्योती मेरी जोस यांनीही मास्क परिधान करुन कंम्फर्ट असल्याचं सांगितलं. त्यामुळे, आता या मास्कच्या मागणीनुसार आपण मास्कची निर्मित्ती करणार असल्याचं केविनने एएनआयशी बोलताना म्हटल. 

30 मिनिटांच्या चार्जिंगनंतर 4 ते 6 तासापर्यंत हा मास्क कार्यान्वित राहू शकतो. या मास्कमध्ये लोहचुंबकाचा वापर करण्यात आला आहे. जवळपास सर्वांनीच मास्कबद्दल चांगली प्रतिक्रिया दिली असून यामुळे मास्क घालून बोलणं अधिक सोयीचं झाल्याचं वापरकर्त्यांनी म्हटलंय. तर, केविनकडून या मास्कचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या कंपनीचा शोध घेण्यात येत आहे. 
 

Web Title: Kerala B-Tech student designs 'masks with mics' to ease communication amid Covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.