तिरुअनंतपुरम :केरळमध्ये चुकीच्या पद्धतीने मूल दत्तक घेतल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या मुलाला आंध्र प्रदेशातील एका जोडप्याने दत्तक घेतले असून एक वर्षापासून त्याची काळजी घेत होते. दरम्यान, केरळ राज्य बालकल्याण परिषदेच्या(KSCCW) अधिकाऱ्यांनी आता हे मूल दाम्पत्याकडून परत घेतले आहे आणि मुलाला त्यांच्यासोबत केरळला आणले आहे. केरळ राज्य बाल कल्याण परिषदेचे (KSCCW) अधिकारी रात्री उशिरा आंध्र प्रदेशात पोहोचले आणि मुलाला राज्यात परत आणले. या बालकाला बाल कल्याण समितीने (CWC) बाल संगोपन संस्थेकडे सुपूर्द केले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?आंध्र प्रदेशात एक जोडपे एका वर्षाच्या मुलाची काळजी घेत होते. पण संदेश आला की हे मूल अनुपमा एस चंद्रन यांचे आहे. अनुपमा एस चंद्रन यांच्या म्हणण्यानुसार, तिच्या पालकांनी मुलाला जन्मानंतर लगेच तिच्यापासून वेगळे केले आणि दुसऱ्याला दत्तक दिले. आंध्रातील जोडप्याने मुलाच्या आईच्या परवानगीशिवाय एक वर्षापूर्वी KSCCW च्या माध्यमातून मूल दत्तक घेतले होते. एका वर्षापासून ते त्याची देखभाल करत होते.
अनुपमा यांचा विरोधअनुपमा एस चंद्रन आणि तिचा साथीदार अजित काही दिवसांपासून KSCCW कार्यालयासमोर त्यांच्या मुलाला परत करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करत आहेत. त्याच वेळी, बालकल्याण आयोगाने 18 नोव्हेंबर रोजी आदेश जारी करून KSCCW ला मुलाला राज्यात परत आणण्याचे निर्देश दिले.
डीएनएची मदत घेतली जाईल
या आदेशानंतर, KSCCW अधिकार्यांच्या नेतृत्वाखालील एक पथक आंध्र प्रदेशात गेले आणि शनिवारी या जोडप्याकडून मूल परत घेतले. रविवारी रात्री मुलासोबत टीम तिरुअनंतपुरम विमानतळावर पोहोचली. CWC च्या निर्देशानुसार मुलाला बाल संगोपन संस्थेकडे सोपवले आहे. सीडब्ल्यूसीच्या आदेशानुसार मुलाच्या जैविक पालकांचा शोध घेण्यासाठी डीएनए चाचणीची मदत घेतली जाणार आहे.