Lockdown: लॉकडाऊन परतणार! देवभूमी केरळला केंद्राचा सल्ला; महाराष्ट्रात संचारबंदीचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 08:00 AM2021-08-30T08:00:44+5:302021-08-30T08:01:04+5:30

Lockdown in Kerala soon: तज्ज्ञांनी तिसरी लाट सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे राज्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात बेड आणि ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट उभारले जात आहेत.

Kerala Corona situation to stabilise by Sept 15 if lockdown imposed: Govt sources | Lockdown: लॉकडाऊन परतणार! देवभूमी केरळला केंद्राचा सल्ला; महाराष्ट्रात संचारबंदीचा विचार

Lockdown: लॉकडाऊन परतणार! देवभूमी केरळला केंद्राचा सल्ला; महाराष्ट्रात संचारबंदीचा विचार

Next

नवी दिल्ली: देशात तिसऱ्य़ा लाटेने (Corona Third Wave) चिंता वाढविली असून सणासुदीच्या दिवसांमुळे केरळमध्ये दिवसाला हजारो नव्या रुग्णांची वाढ होत आहे. तज्ज्ञांनी तिसरी लाट सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे राज्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात बेड आणि ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट उभारले जात आहेत. केरळमध्ये ज्या प्रकारे रुग्ण वाढत आहेत, ते पाहून आरोग्य अधिकाऱ्यांनी लॉकडाऊन (Lockdown) लावण्याचा सल्ला दिला आहे. (test positivity ratio (TPR) of 19 per cent, Kerala accounts for over 70 per cent active Covid-19 cases in India. )

केंद्र सरकारच्या या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन शिवाय अन्य कोणताही पर्याय नाहीय. केरळमध्ये आधी टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट 15 टक्के होता, तो 19 टक्के झाला आहे. लॉकडाऊन लावल्यानंतर संक्रमणाच्या प्रसाराची साखळी तुटेल, जसे दिल्लीमध्ये झालेले. केरळमध्ये लॉकडाऊन लावला तर एका पंधरवड्यात परिस्थिती सुधारेल. 

देशात जवळपास सर्व राज्यांत उत्सव येत आहेत. यामुळे केरळमध्ये एका ठराविक दिशेने कंटेन्मेंट झोन बनविणे तसेच लॉकडाऊन लावायला हवा. हा सल्ला केरळ राज्याला देखील पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी, सोमवारी रात्रीपासून रात्रीचा 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. 

महाराष्ट्रात मोठी तयारी...
महाराष्ट्रात मुंबईचे अतिरिक्त आयुक्तसुरेश काकानी यांनी सांगितले, तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी 30000 बेड तयार करण्यात येत आहेत. चेंबूर, महालक्ष्मीमध्ये ऑक्सिजन रिफिलिंग प्लँट लावले जातील. 

राज्यात 60 लाख रुग्ण...
तिसऱ्या लाटेत राज्यात 60 लाख रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 12 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज पाहून काम करत आहे. ऑक्सिजनची उपलब्ध क्षमता वाढवून 2000 मेट्रीक टन करण्यात आली आहे. 
 

Read in English

Web Title: Kerala Corona situation to stabilise by Sept 15 if lockdown imposed: Govt sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.