तिरुअनंतपुरम - दक्षिण भारतात राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. केरळमध्ये रविवारी (5 ऑगस्ट) माकपाच्या एका कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांड प्रकरणामागे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा कार्यकर्त्यांनी माकपाच्या कार्यकर्त्यावर चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात माकपा कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलीस तपास करत असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.