अफेअरचा संशय, भांडणानंतर पत्नी घर सोडून गेली मित्राच्या घरी, संतापलेल्या पतीने चाकूने वार करत दोघांचीही केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 14:00 IST2025-03-03T13:59:25+5:302025-03-03T14:00:03+5:30
Kerala Crime News: मागच्या काही काळात विवाहबाह्य संबंध आणि या संबंधांमधून होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. केरळमधील पत्तनंतिट्टा येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांच्या संशयामधून पतीने पत्नी आणि तिच्या मित्राची निर्घृणपणे हत्या केली.

अफेअरचा संशय, भांडणानंतर पत्नी घर सोडून गेली मित्राच्या घरी, संतापलेल्या पतीने चाकूने वार करत दोघांचीही केली हत्या
मागच्या काही काळात विवाहबाह्य संबंध आणि या संबंधांमधून होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. केरळमधील पत्तनंतिट्टा येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांच्या संशयामधून पतीने पत्नी आणि तिच्या मित्राची निर्घृणपणे हत्या केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना केरळमधील कलंजूर नावाच्या गावात घडली आहे. तसेच हत्या झालेल्या महिलेचं नाव वैष्णवी आणि तिचा मित्र विष्णू असं असल्याचं समोर आलं आहे. वैष्णवी हिचा पती बैजू याला त्याची पत्नी आणि विष्णू यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्या संशयावरूनच बैजू याने वैष्णवी हिचा विष्णूच्या घरापर्यंत पाठलाग केला. त्यानंतर रविवारी रात्री सुमारे ११ वाजता त्याने धारदार हत्याराने सपासप वार करत त्याने वैष्णवी हिची हत्या केली. तर तिचा कथित प्रियकर असलेल्या विष्णू यालाही ठार मारले.
बैजू आणि त्याची पत्नी यांचं घरात भांडण झालं होतं. त्यानंतर वैष्णवी ही कथितपणे घरातून पळून गेली होती. तसेच ती विष्णूच्या घरी राहायला गेली होती. दरम्यान, वैष्णवी हिच्यावर धारदार हत्याराने सपासप वार करत तिची हत्या केल्यानंतर बैजू यांने विष्णूलाही गंभीररीत्या जखमी केले होते. त्याला रुग्णालयात उपचारांसाठी नेत असताना विष्णू याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी विष्णू याला ताब्यात घेतलं असून, पुढील चौकशी सुरू आहे.