Kerala Elephant Death: हत्तीणीच्या मृत्युमागील आणखी एक कारण आलं समोर; शवविच्छेदनातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 02:30 PM2020-06-05T14:30:31+5:302020-06-05T14:52:47+5:30

केरळ पोलिसांनी एका आरोपीस अटक केल्याची माहिती केरळचे वनमंत्री के. राजू यांनी दिली.

Kerala Elephant Death: According to the autopsy report the elephant had not eaten anything for 14 days before her death | Kerala Elephant Death: हत्तीणीच्या मृत्युमागील आणखी एक कारण आलं समोर; शवविच्छेदनातून माहिती उघड

Kerala Elephant Death: हत्तीणीच्या मृत्युमागील आणखी एक कारण आलं समोर; शवविच्छेदनातून माहिती उघड

Next

केरळमधील मलप्पुरम येथे काही निर्दयी लोकांनी गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. अननस खाल्यानंतर हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढणार्‍या मुलासह तिचा मृत्यू झाला. सदर घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

हत्तीणीच्या मृत्यूबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी देशभरातील लोकांनी केवळ शोक व्यक्त केला नाही, तर आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी दबावही टाकण्यात आला आहे. यानंतर याप्रकरणी केरळ पोलिसांनी एका आरोपीस अटक केल्याची माहिती केरळचे वनमंत्री के. राजू यांनी दिली. तर, आणखी संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे. मात्र या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. 

केरळमधील हत्तीणीच्या मृत्युप्रकरणी आरोपीस अटक, वनमंत्र्यांची माहिती

हत्तीणीच्या शवविच्छेदन अहवालानूसार, मृत्यूच्या १४ दिवस आधी हत्तीणीने काहीही खाल्ले नव्हते. अननस खाल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात तिला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करायला लागत होता. त्याचप्रमाणे तिच्या मृत्यूचे मुख्य कारण फुफ्फुसातील पाणी जाणे हे देखील असल्याचे सांगितले जात आहे. पाण्यात श्वास घेतल्यामुळे फुफ्फुसात पाणी शिरल्याने हत्तीणीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण-

अन्नाच्या शोधात ही गर्भवती भुकेलेली हत्तीण जंगलातून बाहेर आली. ती अन्नाच्या शोधात खेड्यात फिरत होती. या हत्तीला स्थानिकांनी अननसातून फटाके खायला दिली. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

बचाव पथकाचा एक भाग असलेले वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी फेसबुकवर यासंबंधीत पोस्ट लिहिल्यानंतर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. मोहन कृष्णन यांनी लिहिले की,"अन्नाच्या शोधात ती गावापाशी आली. मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीचा अनुभव येईल असे तिला वाटलेही नव्हते. गर्भवती असल्याने मनुष्य दया दाखवतील असे तिला वाटले. त्यामुळे तिनं त्या लोकांवर आंधळा विश्वास दाखवला आणि ते अननस खाल्ले. तिच्या डोक्यात फक्त पोटातील बाळाचा विचार होता. पण जे घडलं ते दुर्दैवी होतं." 

CoronaVirus News: O पॉझिटिव्हपेक्षा 'या' रक्त गटातील लोकांना कोरोनाचा जास्त धोका; संशोधकांनी केला दावा

'हत्तीणीने सर्वांवर विश्वास ठेवला. तिने अननस खाल्ल्यावर ती अस्वस्थ झाली आणि काही वेळाने ते (फटाके) पोटात फुटले आणि हत्तीण अस्वस्थ झाली. हत्तीणीला स्वत: साठी नव्हे, तर पोटातील बाळासाठीही त्रास झाला असावा. ती पुढच्या १८ ते २० महिन्यांत जन्म देणार होती.' असं मोहन कृष्णन यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले.

Web Title: Kerala Elephant Death: According to the autopsy report the elephant had not eaten anything for 14 days before her death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.