गर्भवती हत्तीणीच्या निर्घृण हत्येचा देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. भुकेनं व्याकूळ असलेल्या हत्तीणीला अननसाच्या आवरणातून पेटती फटाके खायला दिली आणि त्यामुळे तिचं तोंड भाजलं... त्यानंतर ती काहीच खाऊ न शकल्यानं तिचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. केरळमधील मल्लापूरम भागातील रहिवाशांनी या हत्तीणीची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेचा तीव्र निषेध होत असताना अशाच प्रकारे एका हत्तीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
तिच्या डोळ्यातील वेदना अस्वस्थ करेल; हत्तीणीच्या हत्येचा वाळूशिल्पातून निषेध
कोचीतील कोल्लम जिल्ह्यात हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. युवा मादा हत्तीच्या तोंडात तशाच जखमा होत्या आणि ही घटना महिन्यापूर्वी घडल्याचे सांगण्यात येत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले की,''पठाणपुरम वन विभागात एप्रिल महिन्यात अशाच प्रकारे मृत झालेली हत्तीण आढळली होती. पठाणपुरम येथील किनारी भागात गंभीर अवस्थेत ती हत्तीण सापडली होती. तिचा जबडा तुटला होता आणि त्यामुळे तिला खाण्यास जमत नव्हते.''
''ती खूप अशक्त झाली होती. जेव्हा वन अधिकारी तिच्याकडे गेले तेव्हा तिनं जंगलात धाव घेतली. तिथे कळप तिची वाट पाहत होते, परंतु पुढच्याच दिवशी ती कळपापासून दूर गेली. तिच्यावर उपचार करण्यात आले, परंतु दुर्दैवानं जखमांमुळे तिचा मृत्यू झाला,''असेही अधिकाऱ्याने सांगितले.
..तर ‘त्यांना’ दीड लाखांचे बक्षीस देणार; हत्तीणीच्या मृत्यूनंतर वन्यप्राणी संघटनेचं आवाहन
दुसऱ्या एका अधिकाऱ्यानं PTIला सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरू आहे.''त्या हत्तीलाही फटाक्यांनी भरलेलं खाद्य खायला दिल्याचा संशय आहे आणि त्यामुळे तिच्या तोंडाला दुखापत झाली. तिच्या पोस्टमार्टम अहवालाची आम्हाला प्रतीक्षा आहे,''असे त्या अधिकाऱ्यानं सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Big News : IPL 2020 भारताबाहेर होणार? BCCI करतेय विचार
मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही; गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर भारताचे कुस्तीपटू भडकले
अरे बापरे! दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाची अशी अवस्था? जाणून घ्या Video मागचं सत्य
रिषभ पंतच्या आई आणि बहिणीवर युवकाकडून गंभीर आरोप, पोलिसांनी सुरू केला तपास