कोच्ची – केरळच्या मल्लापूरम येथे झालेल्या गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशात या घटनेचा निषेध होत आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं सर्वांच्या माना खाली झुकल्या. एका भूकेल्या हत्तीणीला स्फोटकांनी भरलेलं अननस खायला देऊन काही निर्दयी लोकांनी तिची हत्या केली. जखमी झालेल्या अवस्थेत हत्तीणीने नदीच्या पाण्यात ३ दिवस न खाता-पिता उपाशीपोटी उभी राहिली. अखेर दुर्दैवाने तिचा अंत झाला.
हत्तीणीच्या या हत्येनंतर हा प्रकार करणाऱ्या आरोपींबाबत सूचना देणाऱ्यांना दीड लाखांचे बक्षीस दिलं जाणार आहे. वाइल्ड लाइफ एसओएल एनजीओने १ लाख तर ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडियाकडून ५० रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. वाइल्ड लाइफ एसओसएसने सांगितलं आहे की, हत्तीणीला स्फोटकांनी भरलेलं अननस खाण्यास दिलेल्या लोकांची सूचना आणि पुरावे देणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपये देण्यात येतील. यासाठी संस्थेने हेल्पलाइन ९९७१६९९७२७ तसेच info@wildlifesos.org यावर ईमेल करुन माहिती देण्याचं आवाहन केले आहे.
ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल असोसिएशनचे कॅम्पेन मॅनेजर सुमंत बिंदुमाधव म्हणाले, या घटनेतील दोषींची माहिती देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही सन्मानित करु, त्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. हवं असेल तर आम्ही आपले नावही गुप्त ठेवू. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळेल, जेणेकरून समाजाला कडक संदेश पाठविला जाईल आणि कोणीही पुन्हा असे कृत्य करू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
जनावरांविरूद्ध अमानुषपणा, शोषण आणि इतर चुकीच्या प्रथांविरूद्ध काम करणार्या या संघटनेने आपला व्हाट्सअप क्रमांक (7674922044) जारी करुन लोकांना या घटनेविषयी आणि अशा प्रकारच्या इतर घटनेविषयी माहिती देण्याचं आवाहन केले आहे. केरळ वनविभागानेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हत्तीणी २७ मे रोजी मन्नारकड वनविभागातील वेलियार नदीत सापडली. ती एक महिन्याची गर्भवती होती. या हत्तीणीच्या मृत्यूनंतर केरळ सरकारवर केंद्राचा आणि लोकांचा दबाव वाढला आहे. या घटनेतील लोकांना तात्काळ पकडलं जावं अशी मागणी करण्यात येत आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
तुम्ही माणुसकी सोडली पण आम्ही नाही; बुडणाऱ्या माणसाला पाहून हत्तीच्या पिल्लानं काय केलं? पाहा
कोरोना संकट काळातही ‘या’ वाहन कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली घसघशीत वाढ
कोरोनाग्रस्ताला घरी पाहून कुटुंबाला आनंद; पण मध्यरात्री पोलीस आले अन् रुग्णाला घेऊन गेले, कारण...
लय भारी! घरी जाण्यासाठी श्रमिक ट्रेनचं तिकीट न मिळाल्याने ‘या’ पठ्ठ्याने काय केलं पाहा?