Kerala Floods : केरळमधील पुरग्रस्तांना मोदी सरकारने पुरेशी मदत केली नाही , राहुल गांधींचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 11:09 AM2018-08-29T11:09:09+5:302018-08-29T11:20:24+5:30

मुसळधार पाऊस आणि पुरस्थितीमुळे केरळमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी केरळला मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. मात्र...

Kerala floods: Central government has not provided adequate assistance to the victims of Kerala, Rahul Gandhi attacks | Kerala Floods : केरळमधील पुरग्रस्तांना मोदी सरकारने पुरेशी मदत केली नाही , राहुल गांधींचा हल्ला

Kerala Floods : केरळमधील पुरग्रस्तांना मोदी सरकारने पुरेशी मदत केली नाही , राहुल गांधींचा हल्ला

Next

कोच्ची - मुसळधार पाऊस आणि पुरस्थितीमुळे केरळमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी केरळला मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारने केरळमधील पुरग्रस्तांना पुरेशी मदत केली नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. 

राहुल गांधी यांनी मंगळवारी केरळमधील पुरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केरळमधील पुराबाबत केंद्राने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. "केंद्र सरकारने केरळमधील पुरग्रस्तांना पुरेशी मदत करणे आवश्यक होते. हे केरळच्या लोकांचे ऋण आहे. हा त्यांचा हक्क आहे. मात्र केंद्र सरकारने जेवढी करणे आवश्यक असते तेवढी मदत केली नाही, याचे मला दु:ख आहे,"असे राहुल गांधी म्हणाले. तसेच मी येथे केरळच्या जनतेच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आलो आहे. राजकारण करण्यासाठी नाही, असेही त्यांनी सांगितले. 




मी काल केरळमधील अनेक मदत केंद्रांना भेट दिली. तेथे राहत असलेले लोक पुनर्वसनाबाबत चिंतीत आहेत. मी केरळण्याच मुख्यमंत्र्यांशीसुद्धा चर्चा केली. या घडीला पुरात नुकसान झालेल्या घरांचे पुन्हा बांधकाम करण्यासाठी मदत केली जाईल, असे आश्वासन सरकारने देणे आवश्यक आहे. तसेच नुकसान भरपाई देण्याच्या आश्वासनाची पूर्तताही लवकरात लवकर होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. 





यावेळी भाजपावरही जोरदार टीका केली. "भारतात दोन व्हिजन आहेत. एक केंद्रीकृत व्हिजन आणि दुसरा विकेंद्रित व्हिजन. यापैकी केंद्रीकृत व्हिजनमध्ये केवळ एका विचारसरणीचा सन्मान केला जातो. तर दुसऱ्या व्हिजनमध्ये सर्व विचार, संस्कृती आणि देशातील विविध लोकांचा सन्मान केला जातो."असे ते म्हणाले.  



 

Web Title: Kerala floods: Central government has not provided adequate assistance to the victims of Kerala, Rahul Gandhi attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.