कोच्ची - मुसळधार पाऊस आणि पुरस्थितीमुळे केरळमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी केरळला मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारने केरळमधील पुरग्रस्तांना पुरेशी मदत केली नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी केरळमधील पुरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केरळमधील पुराबाबत केंद्राने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. "केंद्र सरकारने केरळमधील पुरग्रस्तांना पुरेशी मदत करणे आवश्यक होते. हे केरळच्या लोकांचे ऋण आहे. हा त्यांचा हक्क आहे. मात्र केंद्र सरकारने जेवढी करणे आवश्यक असते तेवढी मदत केली नाही, याचे मला दु:ख आहे,"असे राहुल गांधी म्हणाले. तसेच मी येथे केरळच्या जनतेच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आलो आहे. राजकारण करण्यासाठी नाही, असेही त्यांनी सांगितले.
Kerala Floods : केरळमधील पुरग्रस्तांना मोदी सरकारने पुरेशी मदत केली नाही , राहुल गांधींचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 11:09 AM