Kerala Floods; 'दर्यादील हनन' ! मासे विकून शिक्षण घेणाऱ्या केरळ गर्लकडून पूरग्रस्तांना 1.5 लाख मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 04:06 PM2018-08-19T16:06:02+5:302018-08-19T16:14:07+5:30
केरळमध्ये बीएससीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या हनन हमीद या विद्यार्थीनीने केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दीड लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिले आहेत. हनन आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मासे विक्री..
कोची - केरळमध्ये बीएससीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या हनन हमीद या विद्यार्थीनीनेकेरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दीड लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिले आहेत. हनन आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मासे विक्रीचा व्यवसाय करते. या मिळणाऱ्या पैशांमधून ती आपल्या आईचा आणि भावाचा खर्च भागवते. आज हननने मासे विक्रीमधून मिळालेला सर्व पैसा पूरग्रस्तांना मदत म्हणून दिला. हननच्या या 'दर्यादील' कामगिरीमुळे नेटीझन्सकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Kerala Floods; 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे', Paytm च्या मालकास नेटीझन्सने सुनावले
एकीकडे अब्जाधीश असलेल्या पेटीएमचे मालक विजय शेखर शर्मा यांनी केरळला मदत म्हणून केवळ 10 हजारांची मदत दिली आहे. त्यामुळे शर्मा यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तर गरिबीचे चटके सोसत जीवन जगणाऱ्या हननने आपली सर्व कमाईच केरळसाठी मदतनिधी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली आहे. या मदतीमुळे हनन चर्चेत आली आहे. पण, यापूर्वीही ती चर्चांमध्ये आली होती. जेव्हा तिचा मासेवक्री करतानाचा कॉलेज ड्रेसमधील फोटो व्हायरला झाला होता. तेव्हा लोकांनी तिला ट्रोल केले होते. तसेच तिचा फोटो खोटा असून हा सर्व बनावा आहे, असे लोकांनी म्हटले होते. पण, या सर्व प्रकारांना नंतर हननने तिचा एक व्हिडिओ पोस्ट करून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी विनंती केली होती. त्यानंतर केरळ सरकारमधील केंद्रीय मंत्री अल्फोंस कन्नाथनम यांनी ट्रोलचा विरोध केला होता. तसेच, हननचे आयुष्य खूप संघर्ष पूर्ण आहे. ती खूप हलाखीचे दिवस जगते. तिचे हे संघर्षमय जीवन खोटे नसून खरे आहे, असे कन्नाथमनम यांनी सांगितले होते. त्यानंतर, केरळमधील काही लोकांनी तिला शिक्षणासाठी मदत केली होती. मला ज्या लोकांनी मदत केली होती त्याच्या मदतीची मी आज परतफेड करत आहे. कारण, ते लोक आज पुराचा सामना करत आहेत, त्यांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे, असे 21 वर्षीय हनन हमीदने मदत करताना म्हटले आहे. हननच्या या मदतीमुळे आणि दर्यादील स्वभावामुळे हननवर कौतुकांचा वर्षाव आहे.