शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

Kerala Floods; 'दर्यादील हनन' ! मासे विकून शिक्षण घेणाऱ्या केरळ गर्लकडून पूरग्रस्तांना 1.5 लाख मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 4:06 PM

केरळमध्ये बीएससीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या हनन हमीद या विद्यार्थीनीने केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दीड लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिले आहेत. हनन आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मासे विक्री..

कोची - केरळमध्ये बीएससीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या हनन हमीद या विद्यार्थीनीनेकेरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दीड लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिले आहेत. हनन आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मासे विक्रीचा व्यवसाय करते. या मिळणाऱ्या पैशांमधून ती आपल्या आईचा आणि भावाचा खर्च भागवते. आज हननने मासे विक्रीमधून मिळालेला सर्व पैसा पूरग्रस्तांना मदत म्हणून दिला. हननच्या या 'दर्यादील' कामगिरीमुळे नेटीझन्सकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Kerala Floods; 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे', Paytm च्या मालकास नेटीझन्सने सुनावले

एकीकडे अब्जाधीश असलेल्या पेटीएमचे मालक विजय शेखर शर्मा यांनी  केरळला मदत म्हणून केवळ 10 हजारांची मदत दिली आहे. त्यामुळे शर्मा यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तर गरिबीचे चटके सोसत जीवन जगणाऱ्या हननने आपली सर्व कमाईच केरळसाठी मदतनिधी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली आहे. या मदतीमुळे हनन चर्चेत आली आहे. पण, यापूर्वीही ती चर्चांमध्ये आली होती. जेव्हा तिचा मासेवक्री करतानाचा कॉलेज ड्रेसमधील फोटो व्हायरला झाला होता. तेव्हा लोकांनी तिला ट्रोल केले होते. तसेच तिचा फोटो खोटा असून हा सर्व बनावा आहे, असे लोकांनी म्हटले होते. पण, या सर्व प्रकारांना नंतर हननने तिचा एक व्हिडिओ पोस्ट करून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी विनंती केली होती. त्यानंतर केरळ सरकारमधील केंद्रीय मंत्री अल्फोंस कन्नाथनम यांनी ट्रोलचा विरोध केला होता. तसेच, हननचे आयुष्य खूप संघर्ष पूर्ण आहे. ती खूप हलाखीचे दिवस जगते. तिचे हे संघर्षमय जीवन खोटे नसून खरे आहे, असे कन्नाथमनम यांनी सांगितले होते. त्यानंतर, केरळमधील काही लोकांनी तिला शिक्षणासाठी मदत केली होती. मला ज्या लोकांनी मदत केली होती त्याच्या मदतीची मी आज परतफेड करत आहे. कारण, ते लोक आज पुराचा सामना करत आहेत, त्यांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे, असे 21 वर्षीय हनन हमीदने मदत करताना म्हटले आहे. हननच्या या मदतीमुळे आणि दर्यादील स्वभावामुळे हननवर कौतुकांचा वर्षाव आहे.

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरFishermanमच्छीमारStudentविद्यार्थीKeralaकेरळRainपाऊस