तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आपत्ती नियंत्रण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इडुक्कीमध्ये भूस्खलन होऊन 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, मलप्पुरममध्ये 5, कन्नूरमध्ये 2 आणि वायनाड जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच, वायनाड, पलक्कड आणि कोझिकोड याठिकाणी काही लोक बेपत्ता झाल्याचे समजते. तर, इडुक्कीमधील अडीमाली शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये पावसाचा हाहाकार, 22 जणांचा मृत्यू, पाहा फोटो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 17:19 IST