कोची - मुसळधार पावसानंतर केरळमध्ये आलेला पूर आता हळुहळू ओसरू लागला आहे. मात्र पाणी ओसरू लागल्यानंतर या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे विदारक चित्र समोर येऊ लागले आहे. केरळमधील अरनमुला जिल्ह्यातील दुर्मीळ ठेव्याचेही या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अरनमुला जिल्हा विशेष प्रकारचे आसरे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच या आरशांना युनेस्कोचे जीआय मानांकन मिळालेले आहे. हे मानांकन अशा वस्तूंनाच मिळते ज्या वस्तुंची निर्मिती करण्याचा अधिकार त्या प्रदेशाकडे असतो. अरनमुलामधील हे आरसे ही केरळच्या सर्वात जुन्या कलात्मक वारशांपैकी एक कला आहे. हे आरसे कथील आणि तांब्याच्या मिश्रणापासून बनवले जातात. ही कला अरनमुला जिल्ह्यातील केवळ 22 कुटुंबांनाच अवगत आहे. अरनमुला कन्नडी नावाने प्रसिद्ध असलेले हे आरसे केरळची अधिकृत भेटवस्तू म्हणून ओळखले जातात. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, प्रिन्स चार्ल्स, भारताचे राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांनाही हे आरसे भेट म्हणून देण्यात आलेले आहेत.
Kerala Floods : केरळच्या पावसात उद्ध्वस्त झाला दुर्मीळ ठेवा, कोट्यवधीचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 2:36 PM