शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

Kerala Floods: केरळच्या नवनिर्माणासाठी यूएईचे ७०० कोटी नकोत, केंद्र सरकारचा 'स्वबळा'चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 9:07 AM

केरळमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या केरळसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

तिरुअनंतपूरम- केरळमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या केरळसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु यूएईनं केरळला देऊ केलेली 700 कोटींची मदत केंद्र सरकारनं धुडकावली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि केरळ सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. बुधवारी केंद्र सरकारनं केरळ पूरग्रस्तांना देण्यात आलेली परदेशी मदत नाकारली आहे. संयुक्त अरब अमिराती(यूएई)नं केरळच्या सहाय्यता निधीसाठी 700 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. केरळ राज्य ही मदत स्वीकारण्यास तयार आहे. परंतु केंद्र सरकारनं ही मदत नाकारली आहे.केंद्र सरकार या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी फक्त घरगुती प्रयत्न करण्याच्या विचारात आहे. काँग्रेसनं केंद्राच्या या कृतीचा निषेध नोंदवला आहे. तर केरळ सरकारनं 2016च्या राष्ट्रीय आपत्ती निवारणाचा हवाला देत सांगितलं आहे की, एखादा देश स्वेच्छेनं पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तयार असेल आणि त्या राज्याच्या सरकारला ते मान्य असेल. तर केंद्र सरकारही अशी मदत स्वीकारू शकतो. केंद्राबरोबर आमची चर्चा सुरू आहे, असंही केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं आहे.  माजी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलं पत्रकेरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमन चांडी यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. नियम असे असले पाहिजेत, जेणेकरून लोकांच्या अडचणी सोडवल्या जातील. त्यामुळे कोणी देशाला मदत करू इच्छित असल्यास ती दूर करण्याची जबाबदारी केंद्राची आहे. 

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूर