नवी दिल्ली- केरळमध्ये आलेल्या महापूरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमधील लोकांच्या मदतीसाठी संपूर्ण भारतामधून लोक धावून आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आपत्कालीन निधीमध्ये आतापर्यंत 1000 कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झालेला आहे.
गुरुवारी रात्रीपर्यंत केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या आपत्कालीन निधीमध्ये 1,026 कोटी जमा झाले होते. सुमारे 4.76 लाख लोकांनी मुख्यमंत्री निधीमध्ये पैसे जमा केले आहेत. या निधीमध्ये 145.17 कोटी इलेक्ट्रॉनिक पेमेंटने जमा करण्यात आले आहेत. तर 46.06 कोटी यूपीआयद्वारे जमा करण्यात आले आहेत. सर्वाधीक 835.86 कोटी थेट जमा करुन किंवा धनादेशाद्वारे जमा केले गेले आहेत.केरळची पुनरावृत्ती महाराष्ट्रतही होईल, तज्ज्ञांचा इशाराया पुरामुळे केरळमध्ये आजपर्यंत 483 लोकांचे प्राण गेले आहेत. तर 14.50 लाख लोकांना निवारा शिबिरांचा आधार घ्यावा लागला.केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी या पुरामुळे मोठे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पुरामध्ये 14 लोक अजूनही बेपत्ता झाले आहेत. पुराचे पाणी आता ओसरले आहे. या पुरामुळे एकूण 57 हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.