थिरुवनंतपुरम : केरळमध्ये ८ आॅगस्टपासून सलग १५ दिवसांच्या अतिवृष्टीने झालेल्या महाप्रलयात केलेल्या अतुलनीय मदत आणि बचाव कार्याबद्दल सर्वांकडून शाबासकी आणि वाहवा मिळवत तिन्ही सैन्यदलांनी रविवारपासून तेथे सुरु असलेले आपले मानवतावादी नागरी साह्याचे काम आटोपते घेतले. मात्र वैद्यकीय सेवा देण्यासाठी सैन्यदलांनी सुरु केलेल्या सुविधा आणखी काही दिवस सुरु राहतील. केरळ सरकारनेही औपचारिक निरोप समारंभ आयोदित करून या न भूतो आपत्तीत मदतीला धावून आल्याबद्दल सैन्यदलांचे आभार मानले.
केरळमधील मदत आणि बचाव कार्यासाठी हवाई दलाने ‘आॅपरेशन करुणा’, नौदलाने ‘आॅपरेशन मदद’ आणि भारतीय लष्कराने ‘आॅपरेशन राहत’ हाती घेतले होते. सैन्यदलांच्या इतिहासात तिन्ही दलांनी एकाचवेळी, एकाच ठिकाणी एकत्रितपणे हाती घेतलेलीे ही सर्वात मोठीे मानवतावादी मदतीची मोहीम होती. केवळ शत्रूपासूनच नव्हे तर कोपलेल्या निसर्गापासून संरक्षणासाठीही सैन्यदले तेवढ्यात तत्परतेने व सज्जतेने धावून येतात, असा आश्वासक संदेश यातून देशाला दिला गेला.
सैन्यदलाच्या दक्षिण कमांडने, नौदलाच्या पूर्व कमांडने आणि हवाई दलाच्या दक्षिण कमांडने सैन्यदलांच्या या समन्वित मोहिमांचे सूत्रसंचालन केले. दि. ८ आॅगस्ट रोजी राज्य सरकारकडून पहिला ‘अॅलर्ट’ मिळताच तिन्ही सैन्यदलांच्या मदत व बचाव तुकड्या लगेच धावून आल्या. परंतु त्यानंतर कित्येक दिवस राहिलेले खराब हवामान, डोंगराळ आणि दुर्गम भूप्रदेश आणि दाट लोकवस्तीचे भाग यामुळे हे काम दिवसेंदिवस अधिक आव्हानात्मक बनत गेले. भविष्यात या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी या मोहिमांच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने अभ्यास केला जाईल.
हवाई दलाच्या दक्षिण कमांडचे ध्वजाधिकारी एअर मार्सल बी, सुरेश, पंगोदे लष्करी केंद्राचे कमांडर ब्रिगेडियर सी. जी. अरुण, नौदलाच्या दक्षिण कमांडचे कमांडर एस. सनूज आणि तटरक्षक दलाचे कमाडंट व्ही. के. वर्गिस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आपापल्या दलांनी केलेल्या कामाची माहिती दिली. हे काम करताना नागरी प्रशासन व लोकांकडून जे प्रेम आणि सहकार्य मिळले त्याबद्दल त्यांनी आभार मानले. पूर ओसरल्याने आता विस्थापितांच्या पुनर्वसनाचे काम सुरु झाल्याने आम्ही आमचे काम आटोपते घेतले आहे, असेही हे अधिकारी म्हणाले.जवानांनी अशी केली कामगिरीहवाई दल: २६ हेलिकॉप्टर्सच्या साह्याने शेकडो लोकांची सुटका,1200 टन मदतसामुग्रीची वाहतूक व पुरवठा.भारतीय लष्कर: विविध कौशल्ये असलेल्या ६० मदत तुकड्या. २६ तात्पुरते पूल बांधले/मोडलेले दुरुस्त केले. वाहून गेलेले व दरडी कोसळून बंद झालेले ५० रस्ते वाहतुकीस खुले केले. पुरात अडकलेल्या १५ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले.नौदल: २० विमाने व हेलिकॉप्टरचा ताफा कार्यरत. १६,८४३ लोकांना बोटींमधून तर १,१७३ लोकांना हेलिकॉप्टरनी पूरातून बाहेर काढले.तट रक्षक दल: ३६ जहाजे व ३६ मदत पथके सक्रियतेने कार्यरत. १७ वैद्यकीय शिबिरे चालविली. १७७ टन मदतसामुग्री जागोजागी पोहोचविली.सशस्त्र दलाचे जवान केरळमधील मदत कार्याचे नायककेरळमधील पुराच्या संकटाचा सामना करणाऱ्या लोकांना मदत करणाºया सशस्त्र दलाचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, केरळमधील मदत कार्याचे नायक सशस्त्र दलाचे जवान आहेत. आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांनी हे कौतुक केले.पण, कधीकधी ही अतिवृष्टी विनाशकारी पूर घेऊन येते. केरळमधील भीषण पुराने मोठे नुकसान झाले आहे. आज या कठीण परिस्थितीत पूर्ण देश केरळसोबत उभा आहे. जी मनुष्यहानी झाली आहे त्याची भरपाई होऊ शकत नाही. पण, त्या कुटुंबीयांना मी विश्वास देऊ इच्छितो की, सव्वाशे कोटी भारतीय आज आपल्यासोबत आहेत.