Kerala Floods: सरासरीच्या तिप्पट पाऊस; रविवारी हलक्या सरींची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 09:20 AM2018-08-18T09:20:52+5:302018-08-18T09:22:15+5:30
16 ऑगस्टला 137 मिमी पाऊस कोसळला
नवी दिल्ली : 'गॉड्स ओन कंट्री' केरळमध्ये आठवडाभरात थोडाथोडका नव्हे तर साडेतीन पट पाऊस कोसळला आहे. 16 ऑगस्टला दिवसाच्या सरासरीच्या तब्बल दहापट अधिक पाऊस कोसळल्याने हाहाकार माजला आहे. 8 ऑगस्टपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार केरळमध्ये ऑगस्ट महिन्यात आता पर्यंत सरासरीच्या 2.7 पट पाऊस झाला आहे. 16 ऑगस्टला 137 मिमी पाऊस कोसळला. मात्र, रविवारी पावसाची तिव्रता कमी होण्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेल्या 9 दिवसांपासून केरळमध्ये पाऊस कोसळत असल्याने निम्म्याहून अधिक राज्य पाण्याखाली गेले आहे. ओडिशाजवळील बंगालच्या खाडीमध्ये दोनवेळा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. पहिला 7 ऑगस्ट आणि दुसरा 13 ऑगस्टला बनला होता.
केरळमधील 14 पैकी 9 जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सरासरीपेक्षा 10 पटींनी जास्त पाऊस कोसळला. या दिवशी इडुक्कीमध्ये सर्वाधिक पावासाची नोंद झाली. येथे 13 पट जास्त पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमी दाबाच्या पट्टयाचा परिणाम कमी होऊ लागला आहे. यामुळे रविवारी हलक्या सरी कोसळतील.