शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

केरळात डाव्या पक्षांना ‘सोने’ महागात पडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 6:31 AM

ऐन प्रचारात मुद्दा तापला : कोरोना काळातील काम झाकोळण्याची भीती

पोपट पवारलोकमत न्यूज नेटवर्क तिरुवनंतपुरम :  कोरोना काळात चांगले काम केल्याने केरळातील डाव्या पक्षाच्या नेतृत्त्वाखालील एलडीएफ सरकारची प्रतिमा देशभर उजळून निघाली खरी. मात्र, गतवर्षी केरळमध्ये झालेल्या सोने तस्करीचे भूत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डाव्या पक्षांच्या मानगुटीवर बसल्याने डाव्या पक्षांची पुरती कोंडी झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांची नावे सोने तस्करी प्रकरणात अडकल्याने विरोधकांनी डाव्यांविरोधात रान उठविले आहे. त्यामुळे केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी उकरून काढलेले ‘सोने’ डाव्यांना महागात पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळल्यानंतर तेथे मोठ्या संसर्गाची भीती व्यक्त झाली होती. मात्र, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मंत्रिमंडळाने कोरोनाकाळात सर्वाधिक चांगल्या उपाययोजना करीत कोरोनाला रोखण्यात यश मिळविले होते. विशेषत: आरोग्यमंत्री के. शैलजा यांच्या कामाची तर जगभर स्तुती झाली होती. ६० लाख नागरिकांना प्रत्येकी १६०० रुपये पेन्शन, ८० लाख कुटुंबांना धान्य कीट, तर कोरोना रुग्णावर मोफत उपचार यांसारख्या अनेक सुविधा देऊन केरळमधील एलडीएफ सरकारने आपली प्रतिमा उंचावली आहे. सोने तस्करीची ही घटना ५ जुलै २०२० रोजी घडली होती. त्यानंतर राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीने घवघवीत यश मिळवले होते. ५ पैकी ४ महानगरपालिका, तर १५० पैकी १०८ पंचायत समित्यांवर डाव्यांनी झेंडा फडकविला होता. 

शबरीमाला नव्हे... सोन्यावर बोलाn    शबरीमाला मंदिराच्या प्रवेशावरून केरळमध्ये डावे पक्ष आणि भाजपमध्ये सातत्याने वादाच्या ठिणग्या पडत असतात. लोकसभा निवडणुकीत तर भाजपने शबरीमाला मंदिराचा मुद्दा घेऊन राज्यभर डाव्यांविरोधात संघर्ष केला. यात हिंदूंच्या मतांमध्ये ध्रुवीकरण करण्यातही भाजप यशस्वी ठरला. n    विधानसभा निवडणुकीत मात्र, भाजपने शबरीमालापेक्षाही सोने तस्करीचा मुद्दा अधिक आक्रमकपणे उचलत डाव्यांना खिंडीत गाठले आहे. भाजपने मेट्रोमॅन ई श्रीधरन यांचा चेहरा पुढे केला आहे.

टॅग्स :KeralaकेरळElectionनिवडणूकChief Ministerमुख्यमंत्री